शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणारे ११ जण अटकेत

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

सिने कलाकार, राजकारणी, उद्योगपती यांचे फार्महाऊस कर्जतमध्ये आहेत. त्यामुळे या बंगल्यामध्ये धनिकांनी आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात लपवला आहे, अशी माहिती

कर्जत : सिने कलाकार, राजकारणी, उद्योगपती यांचे फार्महाऊस कर्जतमध्ये आहेत. त्यामुळे या बंगल्यामध्ये धनिकांनी आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात लपवला आहे, अशी माहिती त्याच फार्महाऊसवर काम करणारे कामगार देत असल्याने फार्महाऊसमध्ये अनेक वेळा चोऱ्या झाल्याचे समोर आले आहे. असा प्रकार अडीच महिन्यांपूर्वी कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील एका फार्महाऊसवर झाला.फार्महाऊसमध्ये १० कोटींपेक्षा जास्त काळा पैसा मालकाने लपवला आहे, असे सांगितल्याने तेथील कामगार व बाहेरील माणसांनी संगनमताने फार्महाऊस फोडले मात्र त्यांची फार मोठी निराशा झाली आणि फक्त ९० हजार हाती लागले. या प्रकारात पोलीस कोठडीत बसण्याची वेळ त्याच्यावर आली. यामध्ये कर्जत पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून, अजून काही जणांचा पोलीस तपास करीत आहेत.मुंबई येथे राहणारे आशिष जोशी यांचे कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे फार्महाऊस आहे. या फार्म हाऊसवर १२ जुलै २०१६ रोजी चोरी झाली अशी तक्र ार त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या घरफोडीचा तपास सुरु केला. तेंव्हा ही घरफोडी सिनेस्टाईलने झाली असल्याचे लक्षात आले. जोशी यांच्या फार्महाऊसची तांबस येथील पंढरीनाथ गंगावणे हा देखरेख करत होता. त्याचा मित्र राजेंद्र शेळके हा त्याला भेटायला आला. त्यावेळी दोघांच्यात बंगल्याच्या तिजोरीत पैसा आहे अशी चर्चा झाली. राजेंद्र शेळके याने ही माहिती नवी मुंबई येथील एका राजकीय नेत्याच्या मुलास दिली. त्याने मुंबईमधील काही मित्रांना सांगितली. अशी ही माहिती पुढे गेली आणि मग या सर्वांनी मिळून १२ जुलै ला चोरी के ली. मात्र के वळ ९० हजार रुपयांचाच ऐवज त्यांना सापडला.पोलिसांनी या प्रकरणी अण्णासाहेब देवडकर (रा. कळंबोली), मयूर घनवट (रा. कामोठे,) सचिन खुडे (रा. कामोठे), केतन चव्हाण (रा. काळाचौकी, मुंबई), गणेश मोरे (रा. लालबाग, मुंबई),गणेशा जाधव (रा. काळाचौकी), चंद्रकांत मोरे (रा. कांदिवली), राजेंद्र शेळके (रा. कर्जत), पंढरीनाथ गंगावणे (रा. कर्जत तांबस), प्रकाश बाईत (रा.मुंबई), राजेंद्र गडकर (रा.मुंबई) या अकरा जणांना अटक केली आहे. दोन चारचाकी जप्त केल्या आहेत. (वार्ताहर)