शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मोहरमनिमित्त १०० मिरवणुका

By admin | Updated: October 13, 2016 04:04 IST

मुस्लीम धर्मियांचा ताजिया मोहरमनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी १०० मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी मुस्लीम समाजातील नागरिकांनी प्रचंड

अलिबाग : मुस्लीम धर्मियांचा ताजिया मोहरमनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी १०० मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी मुस्लीम समाजातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.मुस्लीम समाज या दिवसाला वर्षारंभ मानतात. मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेले प्रेषित महंमद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन अली यांचा याच पवित्र महिन्यात मृत्यू झाला होता. दु:खद प्रसंगाची स्मृती म्हणूनही मोहरम साजरा केला जातो.मोहरममध्ये ताबूत करण्याची प्रथा १४ व्या शतकामध्ये अमिर तैमुर लंगने सुरू केल्याचा उल्लेख आढळतो. सर्वांना पाणी मिळावे यासाठी तेथे पाण्याने भरलेले मडके ठेवलेले आपल्याला दिसून येते. ताबुतचा प्रघात भारत, पर्शिया, इजिप्तमध्ये आढळतो. मुस्लिमांचे पवित्र श्रध्दास्थान असलेल्या मक्केकडे याचे तोंड केलेले दिसून येते. मोहरमनिमित्त जिल्ह्यामध्ये सायंकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. एका मोठ्या काठीला नवीन पवित्र वस्त्र गुंडाळलेले होते. त्यावर पंजाचे चिन्ह होते. मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनी आपल्या अंगावर धारदार शस्त्रांनी वार करून घेतले. त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्यावेळी तेथे असणारी उदी ते सर्वांगाला लावत होते. यामध्ये तरुणांसह वृध्दांचाही समावेश होता. मिरवणुकीला मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. दरम्यान, या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये जिल्ह्यात सीआरपीएफचे एक प्लाटून, चार आरसीबी प्लाटून, सहा स्ट्रायकिंग फोर्स ४०० होमगार्ड यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)