शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येला घरघर!

By admin | Updated: September 15, 2014 05:08 IST

जुन्नर तालुक्यात शाळांच्या पटसंख्येला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुका घटत्या पटसंख्येत क्रमांक एकवर आहे.

खोडद : जुन्नर तालुक्यात शाळांच्या पटसंख्येला घरघर लागली असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुका घटत्या पटसंख्येत क्रमांक एकवर आहे. त्यातच २९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी किंवा विद्यार्थी पटसंख्या टिकून राहावी म्हणून शासनाच्या वतीने ई-लर्निंग, सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता, मोफत गणवेश वाटप, आरोग्य तपासणी, मोफत शिक्षण या सारख्या विविध योजना राबवूनही पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ओघ कमी प्रमाणात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या जुन्नर तालुक्यातच सर्वाधिक आहे. एकाच गावात वेगवेगळ्या पाच इंग्रजी माध्यमांच्या गाड्या डेरेदाखल होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र गावागावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहावयास मिळत आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७४८ शाळा असून या शाळांमधील १ लाख २२ हजार ८१३ मुले तर १ लाख १६ हजार ७१६ मुली शिक्षण घेत आहेत. मात्र जिल्ह्याची आकडेवारी पाहता विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी ११ हजाराने कमी होत आहे, भविष्यात ही बाब जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांसाठी चिंताजनक ठरणार आहे. जुन्नर तालुक्यातील २९ शिक्षक तर खेड तालुक्यातील २ शिक्षक अतिरिक्त ठरत तालुकाबाह्य होत आहेत. (वार्ताहर)