शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंदेकर टोळीला बातम्या देण्याच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गॅंगस्टर बंडू आंदेकर टोळीला बातम्या देतो, अशा संशयावरून ओंकार कुडले व त्याच्या साथीदारांनी तरुणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गॅंगस्टर बंडू आंदेकर टोळीला बातम्या देतो, अशा संशयावरून ओंकार कुडले व त्याच्या साथीदारांनी तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयते फिरवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार कुडलेसह तिघांना अटक केली आहे.

राजन मंगेश काळभोर (वय २२, रा. मोहननगर, धनकवडी), ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ), कानिफनाथ विनोद महापुरे (वय २३, रा. डोके तालीम, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोट्या माने, शुभम पवळे, आकाश सासवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार कुडले याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सूर्यकांत आंदेकर याला अटक केली आहे. ती घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डोके तालीमजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका १६ वर्षांच्या मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र घराजवळ थांबलेले असताना ओंकार कुडले व इतर हातात कोयते घेऊन हवेत फिरवत दुचाकीवरून ट्रिपलसीट आले. कानिफनाथ महापुरे याने हाच तो आद्या उंकरडे तुला आज आम्ही बघतोच, हा सूरज ठोंबरेच्या बातम्या आंदेकर टोळीला देऊन लावालाव्या करतो. तुला आज संपवतोच. सूरजभाऊ ठोंबरेनी याला संपवायला सांगितले आहे, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तसेच इतरांनी हातातील कोयते हवेत उंचावून मोठ्याने सूरज भाई का राज आनेवाला है, असे ओरड व शिवीगाळ करीत लोकांमध्ये दहशत निर्माण केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपी रहात असलेल्या ठिकाणी छापे घालून तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते अधिक तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व निरीक्षक हर्षवर्धन गाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील ताकवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

गुन्हेगार कायदा हातात घेईल तर कडक कारवाई

सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर, ओंकार कुडले याच्या अटकेविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असेल तर पोलिसांकडून स्वत:हून त्यांची माहिती काढून अशा गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल.