शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुमचाही फोन होऊ शकतो हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

इंटरनेटचा वापर वाढल्यानं त्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्यादेखील वाढली. त्यामुळे मग सायबर गुन्हेदेखील वाढले. हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक ...

इंटरनेटचा वापर वाढल्यानं त्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची संख्यादेखील वाढली. त्यामुळे मग सायबर गुन्हेदेखील वाढले. हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हॅकिंगच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. फोन हॅक झाला आहे ते ओळखता येऊ शकतो.

कसे ओळखाल फोन हॅक झाला का?

फोन हॅक झाल्यावर डेटाचा वापर वाढतो. कारण इनफेक्टेड डिव्हाईस मॅलेशियस सर्व्हरसोबत जास्त वेळा संपर्क साधतो. सर्व्हरवरून अतिरिक्त मालवेयर डाऊनलोड करून मोबाईल स्वत:ला अपडेट करतो. त्यामुळे डेटाचा वापर वाढतो.

मोबाईल हॅक झाला असल्यास तो बरीच महत्त्वाची माहिती हॅकर्स वापरत असलेल्या सर्व्हरवर पाठवत राहतो. त्यामुळे डेटाचा वापर अधिक होतो. त्यामुळे तुमचा फोन किती डेटा वापरत आहे त्यावर लक्ष ठेवा. तुमचा फोन अचानक बॅटरीचा जास्त वापर करून लागल्यास सावध व्हा. अनेकदा मालवेअर सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. याशिवाय फोनच्या परफॉर्मन्सवरदेखील परिणाम होतो. तो वारंवार रिस्टार्ट होऊ लागतो. तुम्ही इन्स्टॉल केले नसलेले अॅप मोबाईलमध्ये दिसू लागल्यास सतर्क राहा. फोन वापरता वापरता हँग होत असल्यास सावध व्हा. फोन हॅक झाल्यावर अनेकदा पॉपॲड दिसू लागतात.

पहिल्यांदा हे करा

वरील सर्व गोष्टी तुमच्या फोनसोबत होत असल्यास काही गोष्टी तातडीनं करायला हव्यात. सर्वात आधी तुमचा फोन रिसेट करा. याशिवाय तुमचे बँकिंग पासवर्ड, ई-मेल आणि दुसऱ्या अकाऊंटचे पासवर्ड बदला.

हॅकरपासून वाचण्यासाठी

फोन हॅक होऊ नये यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. कोणते ॲप प्ले स्टोअरमधूनच डाऊनलोड करा. कोणत्याही अज्ञात लिंक किंवा वेबसाईटवरून ॲप डाऊनलोड करू नका. फोनच्या सुरक्षेसाठी एखादं चांगलं अँटिव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.