शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकर तरुणाला अटक -पहिले लग्न झाल्याचे ठेवले होते लपवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

-पहिले लग्न झाल्याचे ठेवले होते लपवून लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पहिले लग्न झाल्याचे समजल्यावर प्रियकर तरुण व त्याच्या ...

-पहिले लग्न झाल्याचे ठेवले होते लपवून

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पहिले लग्न झाल्याचे समजल्यावर प्रियकर तरुण व त्याच्या आईवडिलांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

नितीन दत्तात्रय कांबळे (वय २३, रा. पानमळा, वडकी, ता. हवेली) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनीषा गोविंद गायकवाड (वय २२, रा. फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना फुरसुंगीमध्ये १७ ऑगस्टला सकाळी घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा गायकवाड आणि नितीन कांबळे यांचे प्रेमसंबंध होते. त्याची नितीन कांबळे याच्या आईवडिलांना माहिती होती. असे असताना त्यांनी त्याबाबत कधीही फिर्यादी यांना कळविले नाही. नितीन कांबळे याचे यापूर्वी लग्न झाले आहे, हे मनीषा हिला समजल्याने तिला मोठा धक्का बसला. त्याबाबत तिने नितीन कांबळे याला मेसेज करून विचारणा केल्यावर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून मनीषा हिने १७ ऑगस्ट रोजी एक चिठ्ठी लिहून घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. या तपासात मनीषाने लिहिलेली चिठ्ठी व तिचे मोबाईलवरील मेसेज यावरून नितीन व त्याच्या आईवडिलांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून कांबळे याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.