शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तू थांब इथे क्षणभर; पाहशील देखणा कलासंगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देवानंद, गुरुदत्त या कलावंतांच्या वावरामुळे स्मरणीय झालेला गोपाळ कृष्ण गोखले चौक (फग्युर्सन रस्ता) आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देवानंद, गुरुदत्त या कलावंतांच्या वावरामुळे स्मरणीय झालेला गोपाळ कृष्ण गोखले चौक (फग्युर्सन रस्ता) आता कलात्रयीचे नवे रूप घेऊन पुणेकरांसमोर आला आहे. चित्र, नृत्य आणि चित्रण असा कलासंगम आणि समोरच सादरीकरणासाठी एक सुरेख कलाकट्टा या समूह शिल्पाने हा चौक आता सजला आहे.

गोखले चौकातून जाणारी प्रत्येक व्यक्ती क्षणभर तरी इथे थांबायलाच हवी या संकल्पनेतून या चौकातील समूहशिल्प तयार करण्यात आले. कलावंत, ‘गुडलक’चा निवांतपणा, फर्ग्युसन रस्त्यावरची तरुणाईची गर्दी, मोकळा परिसर, जुन्याजाणत्यांच्या आठवणी ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवून येथील कलासंगम तयार करण्यात आला आहे.

कोणीही क्षणभर तरी थबकून पाहावेच अशी ही कल्पना शंकर गोजारे यांची. त्याला मूर्त रूप दिले बनारस विश्वहिंदू विद्यालयाचे सुवर्णपदक विजेते असलेले व गेली अनेक वर्षे पुण्यात स्थायिक झालेले प्रभाकर सिंग यांंनी. एकसारख्या लोखंडी पट्ट्यांच्या सुबक, सुरेख जोडणीतून ही नृत्य, चित्र, चित्रण त्रयी साकारली. हे एक वेगळेच माध्यम असून, प्रभाकर स्वतःच त्याचे संशोधक आहेत. चित्रकाराच्या कुडत्यावरच्या रेषाही स्पष्ट दिसाव्यात इतकी कलाकुसर त्यांनी यात आणली आहे.

‘या चौकातच एका कडेला कलाकट्टा साकारला. असा कट्टा की त्यावर कोणीही कलाकार आपली कला सादर करील. आता परवाच्या सायंकाळी एका बासरीवाल्याने या कट्ट्यावर बसून बासरीवादन केले. त्याआधी तिथेच बसून एका चित्रकाराने येणाऱ्या-जाणाऱ्यांची चित्रे काढून त्यांना दिली. कोणी गिटार वाजवील तर कोणी सतार. कट्ट्याची रचनाच तशी केली आहे. याचसाठी तर कट्टा आहे,’ असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले. त्यांनीच याचे नियोजन केेले.

स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रभाग विकास निधीतून यासाठी अर्थसाह्य केले. कोरोनातल्या टाळेबंदीत हा शिल्पसमूह आवरणाखाली झाकून होता. पाऊसधारांनी त्यावरचे पडदे उतरविले. आता कोरोनाची दुसरी लाटही ओसरली आहे. लवकरच या शिल्प समूहाचे लोकार्पण होत आहे.