शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

‘कॅट’ परीक्षेत पुण्याचा यश चौधरी अव्वल

By admin | Updated: January 10, 2017 03:49 IST

देशातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत

पुणे : देशातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंगमध्ये (सीओईपी) शिक्षण घेत असलेला यश चौधरी हा विद्यार्थी अव्वल ठरला आहे. या परीक्षेत यशसह देशभरातील २० विद्यार्थ्यांना १०० गुणांकन मिळाले आहे.देशातील १३८ केंद्रांवर सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली होती. दि. ४ डिसेंबरला आॅनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला एसएमएसद्वारे निकालाची माहिती देण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार देशातून २० विद्यार्थ्यांना १०० गुणांकन मिळाले असून, सर्व अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये एकाही मुलीचा समावेश नाही. या २० जणांमध्ये ‘सीओईपी’त बी.टेक. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेला यश चौधरी या विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.‘शाळेत असल्यापासून गणिताची आवड आहे. गणिताच्या अनेक परीक्षा दिल्या आहेत. त्यामुळे एमबीए जाण्याचा निर्णय घेतला. त्यातही आयआयएममध्येच प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी कॅट परीक्षा देणे आवश्यक होते. त्यानुसार सात-आठ महिन्यांपासून परीक्षेची तयारी केली. १०० गुणांकन मिळेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे खूप आनंद झाला आहे,’ असे यश म्हणाला. अहमदाबाद व बंगळुरू आयआयएममधून मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतर प्रवेश निश्चित होईल, असे यशने सांगितले. (प्रतिनिधी)