शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीसाठी विश्वासात घेणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 01:50 IST

दौंड तालुक्यातील खोर-देऊळगावगाडा परिसरामध्ये इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे

खोर : दौंड तालुक्यातील खोर-देऊळगावगाडा परिसरामध्ये इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. प्रदूषणविरहित कंपन्या जरी होत असल्या तरी या भागातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाणार का? त्यांच्या जमिनीला योग्य बाजारभाव दिला जाणार का? हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ शेतकऱ्यांच्या जमिनीला सोन्याचे बाजारभाव आणणार का? शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावामध्ये घेऊन एमआयडीसी उभी करणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. दोन्ही जलसिंचनाच्या योजना कार्यान्वित असताना देखील पाणी आणता आले नाही, तर महाराष्ट्र शासन या योजनेचे पाणी घेणार का? असाच सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. खोरमधील ९0 गट तर देऊळगावगाडा मधील ५३ गटांमध्ये जवळपास ६00 ते ७00 हेक्टर क्षेत्र भूसंपादनास असणार आहे. महामंडाळाचे प्रादेशिक अधिकारी अजित रेळेकर यांनी शेतकऱ्यांना संपादित झालेल्या जमिनीच्या १५ टक्के जमीन विकसित करून शेतकऱ्यांच्या देण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. (वार्ताहर)हक्काच्या जमिनीसाठी करावा लागणार संघर्षखोर-देऊळगावगाडा या भागामधील जनता पुरंदर जलसिंचन योजना व जनाई उपसा योजनेचे पाणी मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या संदर्भात संघर्ष करीत आहे. यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा मार्गही अवलंबला. मात्र आजपर्यंत या दोन्ही सिंचन योजनेच्या माध्यमातून या जिरायती परिसराला पाणी आले नाही. तर औद्योगिक वसाहतीला लागणारे पाणी आणणार कोठून? असा प्रश्न उभा राहिला आहे. या भागातील शेतकरी दरवर्षी पाण्याच्या दुष्काळाने होरपळून जात आहे. त्यातच आता हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र आहे.