शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सोफिया बुक शॉप’मध्ये सामावले जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:09 IST

पुस्तकांची आवड त्यांना होती. त्यातच शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचण्यात आली.

- राहुल गायकवाड पुणे : पुस्तकांची आवड त्यांना होती. त्यातच शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचण्यात आली. आपण जे वाचतोय, अनुभवतोय ते लोकांना सांगितलं पाहिजे, त्यांना वाचनाच्या प्रवाहात आणायला हवं हा विचार घेऊन अवघ्या १० पुस्तकांसोबत त्यांनी सुरू केलं सोफिया बुकशॉप. गेल्या २४ वर्षांपासून अडीचशे स्क्वेअर फुटांच्या जागेत सुरू असणाऱ्या या बुक शॉपमध्ये जगातील विविध भाषांमधील, शेकडो लेखकांची पुस्तके आहेत. ओशो आश्रमात येणाºया परदेशी नागरिकांच्या हक्काचं असं हे बुक शॉप असून, सोफिया यांनी जगाच्या संस्कृतींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.मूळच्या कर्नाटकच्या असणाºया सोफिया कुटुंबांसोबत १९८२ ला पुण्यात आल्या. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर काहीकाळ नोकरी केली. पंजाबी घरात लग्न झाल्याने लग्नानंतर त्यांचं नाव सोफिया ठेवण्यात आलं. त्यांच्या माहेरी तशी वाचनाची आवड कोणालाच नव्हती.सासरीसुद्धा वाचनप्रेमी कोणी नव्हते. त्यांच्या वाचनात शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी आली. त्यानंतर आपण जे वाचतोय, अनुभवतोय हे लोकांना सांगितले पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांनी आपली नोकरी सोडून बुकशॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्या घरी कोणालाच आवडला नाही. त्यांनी त्यांच्या पतींच्या मदतीने कोरेगाव पार्कयेथे अवघ्या अडीचशे स्क्वेअरफुटांची खोली या बुकशॉपसाठी मिळवली. पतीकडे असलेल्याअवघ्या १० पुस्तकांसोबत त्यांनी १९९४ साली बुक शॉप सुरू केले. आज जगभरातील अनेक भाषांमधील शेकडो लेखकांची पुस्तके त्यांच्या शॉपमध्ये आहे.>बुक शॉप : भेट देणारे ९० टक्के लोक परदेशीकोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात येणारे परदेशी नागरिक हे या बुक शॉपमध्ये येणारे वाचक आहेत. या बुक शॉपला भेट देणारे ९० टक्के लोक हे परदेशी आहेत. परदेशी लोकांकडून अनेक गोष्टी शिकल्याचे सोफिया सांगतात. या सोफिया बुकशॉपची खासियत म्हणजे एखादे जुने पुस्तक येथे त्या पुस्तकाच्या २५ टक्के किमतीत खरेदी करतात. त्यांच्याकडे येणाºया विविध देशांमधील लोकांकडून त्यांना जगभरातील शेकडो पुस्तके मिळाली. परदेशी नागरिकांसाठीचं हक्काचं ठिकाण आता हे सोफिया बुक शॉप झालं आहे. या बुक शॉपमध्ये कुठेही मिळणार नाहीत अशी अनेक पुस्तके मिळतात. अनेक वर्षांनी पुन्हा भारत भेटीवर येणारे या बुक शॉपचे जुने वाचक या बुक शॉपला आवर्जुन भेट देतात. वाचकांसोबत एक ऋणानुबंध निर्माण झाल्याचे सोफिया आवर्जुन सांगतात. अनेक आॅनलाईन वेबसाइट्सवर पुस्तके मिळत असल्याने वाचकांची संख्या कमी झाली असली, तरी वाचकप्रेमी लोक या बुकशॉपमध्ये येत राहणार असा विश्वास सोफिया यांना वाटतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे बुकशॉप चालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.