शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या विद्युत विभागाचे कामकाज ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : टेबलावरील कागदपत्र आणि फाईलींचे ढीग कमी करुन कामात सुसूत्रता आणि सलगता आणण्याकरिता पालिकेची कार्यालये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : टेबलावरील कागदपत्र आणि फाईलींचे ढीग कमी करुन कामात सुसूत्रता आणि सलगता आणण्याकरिता पालिकेची कार्यालये ‘पेपरलेस’ केली जाणार आहेत. याची सुरुवात विद्यूत विभागापासून करण्यात आली असून या विभागाच्या आवक-जावक आणि कार्यालयीन कागदपत्र आता ऑनलाईन तपासून ऑनलाईनच ‘क्लिअर’ केली जात आहेत. त्यावरील आवश्यक स्वाक्षरीही अधिकारी मोबाईल अथवा संगणकावरुन व्हर्चुअली करीत आहेत. यापुढे फाईलींचा प्रवासही ऑनलाईनच होणार असल्याचे विद्यूतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.

पालिकेच्या संकेतस्थळाच्या डोमेनमध्ये विविध विभागांचे स्वतंत्र आयपी तयार करण्यात आले आहेत. विद्यूत विभागाला स्वतंत्र लॉग-इन दिले आहे. विद्यूत विभागाकडे येणारी पत्रे, टपाल आदी कागदपत्रे स्कॅन करुन या आयपीवर टाकली जातात. ही कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड होतात. आवश्यक कागदपत्रांची मान्यता, स्वाक्षरी ऑनलाईन केली जाते. अधिकारी कार्यालयातील संगणकावर अथवा मोबाईलवरही लॉग-ईन करुन काम करु शकणार आहेत.

कार्यालयीन कामकाजाच्या तसेच ठेकेदार, बिले आदींच्या फाईल ऑनलाईन आणल्या जाणार आहेत. फाईलींचा प्रवास कोणत्या टेबलवरुन कुठे होतो आहे? कोणत्या टेबलावर संबंधित फाईल किती दिवस पडून आहे? याचीही माहिती समजणार आहे. त्यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे. भ्रष्टाचारालाही पायाबंद बसण्यास मदत मिळणार आहे.

===

‘पेपरलेस’ कार्यालयामुळे पर्यावरणपूरक व भ्रष्टाचाराला पायाबंद घालण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल. पालिकेचे सर्व विभाग पेपरलेस करण्याचा प्रयत्न आहे.

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्यूत विभाग