शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

काम आचाऱ्याचे, करत होता घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खानावळीत आचारी म्हणून काम करत असतानाच तो डबे पोहोचविण्याचे काम करत. या कामाच्या आडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खानावळीत आचारी म्हणून काम करत असतानाच तो डबे पोहोचविण्याचे काम करत. या कामाच्या आडून तो बंद घरांची रेकी करून त्याची माहिती आपल्या साथीदारांना देत. त्यानंतर ते घरफोडी करीत. अशा आचाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला अटक केली आहे.

आकाश अशोक उमाप (रा. वानवडी) असे त्याचे नाव आहे. उमाप याच्याकडून शहरातील १३ घरफोडी, १ वाहनचोरी, १ जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू व दागिने, दोन दुचाकी, १ टीव्ही व ४६ हजार रुपये असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना हडपसर येथील जबरी चोरीचा गुन्हा एका आचाऱ्याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनेनुसार मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे यांनी वानवडीतील विकासनगर भागात सापळा रचून आकाश उमाप याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मी स्वत: आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे कामदेखील करतो. तुम्हाला माझ्याबाबत मिळालेली माहिती चुकीची आहे, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.

उमाप हा वानवडी परिसरातील एका मेसमध्ये जेवण बनविण्याचे व डबे पोहोचविण्याचे काम करत आहे. कामाच्या आडून पुण्यातील विविध परिसरात बंद घरांची रेकी तो करत असत. आपल्याला साथीदारांना त्याची माहिती देत असत.

सराईत गुन्हेगार जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलू, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्यासोबत त्याने घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.