शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

वळसेमळा ओढ्याच्या पुलाचे काम अपूर्ण

By admin | Updated: March 28, 2017 02:17 IST

अवसरी बुद्रुक ते निरगुडसर रस्त्यावर वळसेमळा येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला

अवसरी : अवसरी बुद्रुक ते निरगुडसर रस्त्यावर वळसेमळा येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.अवसरी बुद्रुक येथील वळसेमळामार्गे निरगुडसरला जाण्यासाठी एक मार्ग व दुसरा मेंगडेवाडी मार्गे रस्ता आहे. वळसेमळामार्गे गेल्यास तीन किलोमीटर अंतर कमी पडत असल्याने बहुतांशी वाहनचालक वळसेमळामार्गे निरगुडसर-भीमाशंकर साखर कारखाना शिरूरला जातात. मात्र, वळसेमळा येथील ओढ्यावर पूल नसल्याने वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात मोठी कसरत करत पाण्यातून ये-जा करावी लागत असे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे ओढ्यावरील नवीन पूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती. मागणीचा विचार करून वळसे-पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी सहा महिन्यापूर्वी मंजूर केला. लगेचेच पुलाच्या बांधकामाला सुरुवात होऊन आता पुलाचे काम पूर्ण होऊन नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.निरगुडर ते वळसेमळा या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. आता वळसेमळा ते अवसरी बुद्रुक या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.उर्वरित अवसरी बुद्रुक ते वळसेमळा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी निधी मंजूर करावा, अशी मागणी अवसरी बु. येथील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)