शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दोन महिन्यांपासून तळे राखणारे वेतनाविनाच

By admin | Updated: May 9, 2015 03:28 IST

तांत्रिक बाबीमुळे यंदा खडकवासला जलसंपदा विभागाच्या बहुसंख्य अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वेतन होऊ शकलेले नाही.

पुणे : तांत्रिक बाबीमुळे यंदा खडकवासला जलसंपदा विभागाच्या बहुसंख्य अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे वेतन होऊ शकलेले नाही. त्याचा फटका तिसऱ्या, चौथ्या वर्गातील कर्मचाऱ्यांना बसला असून, हात ऊसने पैसे घेऊन संसार चालविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जलसंपदा विभागाची अनेक कार्यालये धरणांच्या संख्येनुसार असून एका उपविभागात अंदाजे १५० ते २०० अधिकारी व कर्मचारी काम करतात. शासनाच्या कार्यपध्दतीनुसार दरवर्षी कोणती कार्यालये सुरू ठेवायची, याचा आढावा घेतला जातो. शासनाची मान्यता घेतली जाते. याबाबतचा अहवाल शासनास सादर केला जातो. मंत्रालय पातळीवर त्यावर त्वरित निर्णय होतो. याला ‘कंटीन्युईटी’ असा शब्द या विभागात प्रचलित आहे. त्यानंतर पगार काढण्याचे काम सुरु होते. यंदा मार्च व एप्रिल असे २ महिने ‘कंटीन्युईटी’ येण्यास विलंब झाला. त्यामुळे तितका उशीर पगार होण्यास झाला. खडकवासला धरणसाखळी प्रणालीत ९ उपविभाग आहेत. कंटीन्युईटी न मिळाल्याने विभागातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन महिने वेतन मिळू शकलेले नाही. कृष्णा खोरे महामंडळाची स्थिती नाजूक असताना यापुर्वी ३ ते ४ महिने वेतन होऊ शकले नव्हते. काही अधिकाऱ्यांनी खासगीत वेतनास झालेल्या विलंबाची बाब मान्य करून दैनंदिन खर्च भागविणे अवघड असल्याची कबुली दिली. २ महिने पगार थकविणे चुकीचे असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कंटीन्युईटी आणि वेतन या धोरणात्मक बाबी असून त्यांचा निर्णय मंत्रालय पातळीवरून होत असतो. अलिकडे वेतन आॅनलाईन केले जाते. ज्या कर्मचाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या प्रकरणांत त्रुटी असतील त्यांचे वेतन मिळण्यास विलंब होतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले. दरम्यान, खडकवासला जलसंपदा विभागाची कंटीन्युईटी २ दिवसांपुर्वी आली असून पगार काढण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.(प्रतिनिधी)