शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जाणार ‘पाण्यात’?

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

पावसाळयात गटारे, नाले तुंबून शहरात पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेकडून करण्यात येणारी पावसाळा पूर्व कामे खूपच संथगतीने चालली आहेत.

पुणे : पावसाळयात गटारे, नाले तुंबून शहरात पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेकडून करण्यात येणारी पावसाळा पूर्व कामे खूपच संथगतीने चालली आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेला असताना अनेक नाले, पावसाळी गटारे अद्यापपर्यंत साफ करण्यात आलेली नाहीत. त्यात साठलेला कचरा पाहता यंदाच्या पावसाळयात पुणे पाण्याखाली जाईल, याची भिती वाढली आहे. पावसाळयात शहरात दररोज पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शहरात पावसाळी गटारे आहेत. मात्र वर्षभर त्यात कचरा पडल्याने पावसाचे पाणी त्यात तुंबून रस्त्यावर येते. त्यामुळे पालिकेकडून पावसाळा सुरू होण्याअगोदर पावसाळी पूर्व कामे हाती घेण्यात येतात. यामध्ये पावसाळी गटारे साफ करणे, नाल्यांमधील कचरा काढून ते वाहते करणे या गोष्टी आहेत. याचबरोबर जोरदार पाऊस आणि वार्‍यांमुळे जी झाडे किंवा फांद्या पडू शकतात, त्याचा सर्वे करून त्या छाटणे ही कामे केली जातात. पुण्यात मॉन्सून येण्यास आता फक्त १७ दिवस शिल्लक राहिले आहेत. मॉन्सून अगोदरचा वळवाचा पाऊस सुरूही झाला आहे. अशात पालिकेने युध्दपातळीवर ही कामे हाती घेण्याची गरज असताना प्रत्यक्षात शहरात ही कामे खूपच स्लो पध्दतीने सुरू आहेत. यामुळे चार दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे, झाडे पडल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतरही पालिका प्रशासन जागे होईल, असे चित्र होते. मात्र प्रत्यक्षात शहरात ही कामे वेगाने करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. अंबील ओढा, एरडंवण्यातून नदीपात्रात सोडण्यात आलेला नाला, डेक्कन येथील नाला आदींमध्ये कचर्‍याचे आणि राडारोडयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पावसाळयात पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे. पाणी तुंबले की शहरातील पावसाळी गटारे तंबून रस्त्यांवर पाणी येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी नालेसफाई करण्यात न आल्याने शहरातील अनेक रस्ते पाऊस पडताच पाण्याखाली गेले होते. त्यामुळे यंदातरी नालेसफाई केली जाईल, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही. काही ठिकाणी पावसाळी गटारांमधून काढलेली घाण तेथेच टाकण्यात येत आहे. ती पुन्हा त्यातच पडत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)