शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सत्ता कायम ठेवणार का?

By admin | Updated: January 12, 2017 02:28 IST

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता आतापर्यंत काँगे्रसचीच आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता आतापर्यंत काँगे्रसचीच आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे. परंतु सध्या राज्यातील सत्ता बदल, नगर पालिकांमधील भाजपचे यश, सेना-भाजप युती झाल्यास बसणारा फटका व काँग्रेस पक्षाबरोबर झालेला काडीमोड व पक्षतंर्गत कलह या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसची जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राहणार का, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेच्या ७५ गट व तेरा पंचायत समितीमधील १५० गणांसाठी येत्या २१ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. सध्या जिल्हापरिषदेत ७५ पैकी ४१ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, शिवसेनचे १३ व काँगे्रसचे ११ सदस्य आहेत. हे दोन्ही पक्ष विरोधी पक्ष म्हणून जिल्हा परिषदेत सक्रीय आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची स्थिती फारशी चांगली नाही. मावळ तालुक्यातील केवळ तीन सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेमधील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजप दोन आकड्यांपर्यंत पोहचणार का हा उत्सुकतेचा विषय आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. ग्रामीण भागात चांगले नेटवर्क देखील आहे. परंतु राष्ट्रवादी काँगे्रसला पक्षातंर्गत कलहाचे ग्रहण लागल्याने याचा मोठा फटका निवडणुकीत बसू शकतो. त्यात इच्छुकांची संख्या देखील प्रचंड आहे. पक्षाचे तिकिट न मिळाल्यास अनेक चांगले कार्यकर्ते भाजपसह अन्य पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शिवसेनेला चांगले वातावरण असल्याची चर्चा आहे. उमेदवारी निवडीपासून मतदानापर्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास शिवसेनेच्या जागा वाढू शकतात. तर राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला अनेक तालुक्यांमध्ये हक्काचे उमेदवार नसले तरी राष्ट्रवादी, काँगे्रस मधील नाराज लोकांना तिकीट देऊन संख्या बळ वाढू शकते. त्यात सेना-भाजपची युती झाल्यास याचा राष्ट्रवादी काँगे्रसला मोठा फटका बसू शकतो.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आमदारकीच्या निवडणुकीत झटका बसला. नगरपरिषद निवडणुकीत इंदापूरमध्ये झगडावे लागले. जिल्हापरिषदेच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता मात्र निश्चितपणे दिसून येत आहे. भरारी पथकाची नजरजिल्हापरिषदेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक विभागाने अंमलबजावणीचे नियोजन केले आहे. राजकीय पक्षांचे फलक काढणे, पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच निवडणूक कालखंडात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ‘फ्लाइंग स्कॉड’ही सज्ज झाले आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्हापरिषद अध्यक्ष, विविध पदाधिकारी यांची वाहने काढून घेण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून आल्या. सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांचे वाहनही जमा केले. प्रशासनाची धावाधावजिल्हापरिषदेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक विभागाने नियोजन सुरू केले आहे. निवडणुकीसाठी कर्मचारी कमी पडणार नाहीत, असे नियोजन केले आहे. तसेच विविध सेलही तयार केले आहेत.