शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तिढा खरच सुटेल?

By admin | Updated: June 14, 2014 01:37 IST

अवैध बांधकामप्रकरणी दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले. परंतु अध्यादेश निघू शकला नाही

पिंपरी : अवैध बांधकामप्रकरणी दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले. परंतु अध्यादेश निघू शकला नाही. समित्या स्थापन करून अहवाल मागविणे हा वेळकाढूपणा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू असताना, विधिमंडळात अवैध बांधकामे नियमितीकरणासंदर्भात अधिनियम तयार करणे अपेक्षित आहे. तरच ठोस तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील अवैध बांधकामांमध्ये विविध प्रकारची अवैध बांधकामे आहेत. नदीपात्रातील बांधकामे, आरक्षणाच्या जागेतील, रेड झोन हद्दीतील, प्राधिकरण संपादित जागेवरील बांधकामे, त्याचबरोबर परवानगी न घेता केलेली असे बांधकामांचे वर्गीकरण आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत नदीपात्रातील बांधकामे, तसेच आरक्षणाच्या जागेतील, प्रकल्पाला अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्यात आली आहेत. ३१ मार्च २०१२ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यानंतर अवैध बांधकामे होऊ देऊ नयेत, असे आदेश देण्यात आले होते. शासन स्तरावर अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे. निदान ३१ मार्च २०१२ नंतर तरी अवैध बांधकामे नियंत्रित ठेवावीत, असे शासनादेश असताना बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने त्या कालावधीत सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई केली. त्या बांधकामांच्या करसंकलन विभागाकडील नोंदी थांबवल्या. सुरू असलेल्या बांधकामांची छायाचित्रे काढली. अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवरही कारवाई केली. शहरातील सुमारे पावणेदोन लाख अवैध बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३१ मार्च २०१२ पूर्वीच्या नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेने धक्का लावलेला नाही. शासन स्तरावर तोडगा निघाल्यास दंड आकारून ही बांधकामे नियमित होऊ शकतील. (प्रतिनिधी)