शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयचे विद्यार्थी आंदोलन मागे घेणार?

By admin | Updated: October 28, 2015 01:33 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे

पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचा विचार एफटीआयआयचे विद्यार्थी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांमध्येच काहीसे दोन गट पडले आहेत.काही विद्यार्थी आता आंदोलनाला कंटाळले असल्याने आंदोलनाला स्वाहा: करण्याचा सूर ते आळवू लागले आहेत. लवकरच स्टुडंट असोसिएशकडून यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांतच संस्थेच्या शैक्षणिक वर्गास सुरुवात होईल, असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.विद्यार्थ्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारल्यामुळे केंद्राला आंदोलनाची दखल घेणे भाग पडले. विद्यार्थ्यांबरोबर मंत्रालय सचिवांच्या जवळपास ३, तर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याबरोबर एक बैठक झाली; मात्र आंदोलनावर तोडगा काढण्यापेक्षा शैक्षणिक अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींवरच यामध्ये अधिकतर चर्चा करण्यात आली. आता केंद्राने पुन्हा ‘मौनव्रत’ धारण केले आहे. आंदोलन पुढे सुरू ठेवायचे का नाही? केंद्राकडून आंदोलन संपुष्टात आणण्याकरिता कोणत्याच हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांची सहनशक्ती आता जवळपास संपली आहे. (प्रतिनिधी)