शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राड्यामुळे स्वीकृत सदस्य नावे बदलणार?

By admin | Updated: May 15, 2017 06:39 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्यपदावरून नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी राडा केला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत सदस्यपदावरून नाराज कार्यकर्त्यांनी शनिवारी राडा केला. खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या प्रतिमेचे दहन केले. आयुक्तांकडे नावे दिल्यानंतरही सर्वसाधारण सभेत नावे बदलता येऊ शकतात. त्यामुळे आशेचा एक किरण निर्माण झाल्याने वादग्रस्त नावे बदलू शकतात, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. उमेदवारी देण्यापासून तर विविध पदे देण्यात स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे राजकारण दिसून आले. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे दिसते. निवडणुकीनंतर आमदार लांडगे गटाचे नितीन काळजे यांना महापौरपद, तर जगतापसमर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद आणि निष्ठावान कार्यकर्ते एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद दिले होते. नव्या-जुन्यांची मोट बांधण्याचे काम नेत्यांनी केले होते. काही प्रमाणात स्थानिक नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण दिसून आले. त्यानंतर स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. स्वीकृतपदी नेत्यांच्या बगलबच्च्यांना संधी देऊ नये, यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. भाजपाकडून स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी देणार की पक्ष संघटनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार, अशी चर्चा रंगली होती. मुख्यमंत्र्यांनी संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे यांची नावे पक्षनेत्यांनी नावे दिली आणि येथूनच गटबाजीला सुरुवात झाली. निष्ठावंतांना डावलल्याने नाराजीस्वीकृत सदस्यपदासाठी माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पदाधिकारी महेश कुलकर्णी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, शांताराम भालेकर, विजय फुगे, सचिन लांडगे, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस बाबू नायर, सूरज बाबर, निहाल पानसरे यांची नावे चर्चेत होती. तसेच पराभूत उमेदवार किंवा पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले, तर पुण्याप्रमाणेच राड्याची तयारीही केली होती. मात्र, राडा होऊ न देण्याची दक्षता मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. खासदार समर्थक थोरात आणि पटवर्धन समर्थक नायर यांना संधी दिल्याने भाजपात नाराजीचा सूर होता. तो शनिवारी उघड झाला.