शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नाठाळाच्या माथी मारणार कोण काठी?

By admin | Updated: July 3, 2016 04:01 IST

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी स्थायी समितीमध्ये खर्चाच्या आकड्यांमध्ये गोलमाल करीत घाईघाईत

पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी स्थायी समितीमध्ये खर्चाच्या आकड्यांमध्ये गोलमाल करीत घाईघाईत ऐनवेळचा विषय मंजूर करून घेतला. मात्र, पालखी सोहळा निम्म्या मार्गात पोहोचला असताना अद्यापही त्याचे कामही सुरू झाले नाही. पालखी सोहळ्याच्या कालावधीत अभंग दृकश्राव्य होणार नसतील, तर ऐनवेळी विषय मंजुरीची घाई कशाला केली, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. ऐनवेळच्या विषयाऐवजी या कामासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबविल्यास आणखी कमी खर्चात हे काम होऊ शकते. आषाढी वारीच्या कालावधीत तुकोबारायांची अभंगगाथा मोबाइलद्वारे तसेच डिजिटल मीडियाद्वारे ऐकावयास मिळावी, यासाठी अभंगगाथा दृकश्राव्य करण्यासाठीच्या विषयास १४ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाच्या खर्चाचे आकडे अक्षरी व अंकी यात तफावत होती. अभंग दृकश्राव्य करण्याच्या कामासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाखांचा विषय स्थायीने मंजूर करवून घेतला होता. हा गैरकारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीला हा चुकीचा ठराव रद्द करणे भाग पडले. यामुळे पाच लाख खर्चाचा प्रस्ताव दाखवून ५० लाख लाटण्याचा स्थायीचा डाव फसला. अखेर अभंग दृकश्राव्य करण्यासाठी येणाऱ्या पाच लाखांचा नवीन ठराव २१ जूनला करण्यात आला. प्रिंटिंग मिस्टिेक झाल्याचे सांगत नवीन ठराव केला. यामध्ये प्रती अभंग १११ रुपये खर्च दाखविण्यात आला असून, चार हजार ५८६ अभंगांसाठी पाच लाख नऊ हजार ४६० रुपये खर्च येत असल्याचे नमूद करून ठराव मंजूर केला. (प्रतिनिधी)दरम्यान, या कामाचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, अद्यापही कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शिवाय, कामाचे आदेश दिले, तरीही हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ऐनवेळचा विषय दाखल करण्याचा खटाटोप स्थायी समितीने कशासाठी केला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली असता निविदेत स्पर्धा होऊन आणखी कमी रकमेत काम झाले असते. मात्र, तसे न करता ऐनवेळचा विषय घुसडण्यात आला. अशा प्रकारे इतरही मोठे खर्चाचे विषय गुपचूपरीत्या मंजूर करून घेतले जात असून, यातून करदात्यांच्या पैशांची एक प्रकारे लूट केली जात असल्याचे स्पष्ट होते.