शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहनांचा धनी कोण?

By admin | Updated: January 12, 2017 02:35 IST

गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या, तसेच उपनगरांच्या विविध भागात

रावेत : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या, तसेच उपनगरांच्या विविध भागात बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. बेवारस आढळणाऱ्या वाहनांच्या संख्येने आता शेकडा पार केला आहे. दुचाकी, रिक्षा, कार, हलकी, तसेच जड वाहने रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये बेवारसपणे पडलेल्या धूळखात, गंजलेल्या अवस्थेत आहेत. सदरची वाहने गेली अनेक दिवस त्याच अवस्थेत आढळली आहेत.प्रशासनाने याची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे. सदरची वाहने ताब्यात घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या, तसेच प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. बेवारस असलेल्या वाहनांचा उपयोग विघातक कार्यासाठी होऊ नये, याकरिता नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून आले आहे, की शहराच्या निगडी, आकुर्डी, यमुनानगर, चिंचवड, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, प्राधिकरण परिसरामध्ये बेवारस वाहने आहेत. त्यांची सुरक्षा तपासणी होणे गरजेची आहे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेवरील उभ्या बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. ही वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर लपवण्याच्या उद्देशाने उभी केलेली असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यालगत पडून असणाऱ्या बेवारस वाहनाचा मालक कोण याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्यालगत बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांची शोधमोहीम पोलिसांत सुरू करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीला शहरात अनेक ठिकाणी अशी बेवारस वाहने उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यालगत, पदपथावर तसेच मोकळ्या मैदानात ही वाहने मोठ्या संख्येने उभी आहेत. त्यापैकी बहुतांश वाहने वर्षानुवर्षे एकाच जागी पडून असतानाही ती हटवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर काही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळीच पडून राहिल्याने त्यांचे टायर अथवा उपयुक्त पार्ट नाहीसे झालेले आहेत.अनेकदा वाहन हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून नफ्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने देखील वाहने बेवारस स्थितीत अज्ञातस्थळी उभी केली जाण्याची शक्यता असते. अशी वाहने थोडीफार सुस्थितीत असतानाही त्याची ओळख पटू नये, याकरिता नंबर प्लेट काढलेली असते.(वार्ताहर)