शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहने परत कधी मिळणार?

By admin | Updated: January 13, 2017 03:26 IST

सासवड रस्त्याच्या कडेला टेम्पोत भाजी विकणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली

हडपसर : सासवड रस्त्याच्या कडेला टेम्पोत भाजी विकणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. वाहतुकीस अडथळा होत असल्याने ही कारवाई गरजेची होती. मात्र, कारवाई झालेल्या वाहनचालकांना दंड आकारून त्यांची वाहने परत देणे आवश्यक असताना अतिक्रमण विभागाकडून दिरंगाई केली जात आहे. हडपसर परिसरातील सासवड रस्त्यावर अनधिकृतपणे भाजीविक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. साधारणपणे या कारवाईस आठवडा होत आला असून, अद्याप या विक्रेत्यांची वाहने विभागाकडून परत देण्यात आली नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, सहायक आयुक्त सुनील गायकवाड आणि कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता, ते कार्यालयीन वेळेत अनेक वेळा फोन स्वीकारतच नाहीत. तर अनेक वेळा मीटिंग सुरू आहे, फाईल अजून आपल्यापर्यंत पोहोचली नाही, फाईल पोहोचल्यानंतर दंडाची पावती बनवून देतो, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. यासंबंधी वाहनचालकांना नीट मार्गदर्शनदेखील केले जात नाही. वाहनचालकांवर नोटाबंदीच्या तुटवड्यामध्ये उपजीविकेचे साधनच हडपसर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अडकवून ठेवल्यामुळे उपासमार व गाडीच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हे कळत नाही, असे वाहनचालक सांगत आहेत.  थ्री व्हीलर, हातगाड्या इत्यादी वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. टेम्पोमालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमा केली आहेत. त्या कागदपत्रांची तपासणी व दंड आकारण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. वाहनचालक सहा दिवसांपासून हेलपाटे मारत आहेत. अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात कधी येणार, याची चौकशी करून कार्यालय बंद होईपर्यंत थांबून रिकाम्या हाताने घरी जात आहेत. कार्यालयातील काही कर्मचारी मदतीसाठी पुढे येतात, तर काही विनाकारण त्रास देत असल्याचे विक्रेते सांगतात.