शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

चहापाण्यासाठी काय तरी द्या !

By admin | Updated: May 9, 2015 03:19 IST

पोटगीची पावणेदोन लाख रुपये रक्कम थकविणाऱ्या पतीविरुद्ध काढलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी ‘चहापाण्यासाठी काही तरी द्या’ असे म्हणणाऱ्या पोलिसाविरुद्ध न्यायालयाने

हिनाकौसर खान-पिंजार, पुणेपोटगीची पावणेदोन लाख रुपये रक्कम थकविणाऱ्या पतीविरुद्ध काढलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी ‘चहापाण्यासाठी काही तरी द्या’ असे म्हणणाऱ्या पोलिसाविरुद्ध न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच संबंधित पोलिसाविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याबाबतही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांनी हा आदेश दिला.मुळशी तालुक्यातील दुर्गेवाडी येथे राहणाऱ्या तिशीतील ज्योती निंबळे हिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली होती. या प्रकरणी दरमहा ७ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने जानेवारी २०१४ ला दिला होता. मात्र, अद्याप तिला पोटगीचा एकही रुपया मिळाला नाही. रक्कम थकल्याने तब्बल पावणेदोन लाख रुपये ज्योतीच्या पतीकडे अडकून पडले आहेत.२७ एप्रिलला ज्योतीची बहीण मंदा दुर्गे ही लोणावळा पोलिसांकडे पोटगी वसुलीच्या खटल्यातील पकड वॉरँट घेऊन गेली. तेव्हा तेथील पोलिसाला वॉरंट दिल्यावर, त्याने ‘वॉरंटबरोबर चहापाण्यासाठी काही नाही का’ अशी विचारणा केली. तसेच, वॉरंटच्या झेरॉक्सवर पोचपावती देण्यास नकार दिला. याबाबत मंदा दुर्गे यांनी अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांच्यामार्फत न्यायालयात ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने पतीविरुद्ध ३ ते ४ वेळा जप्ती वॉरंट, पकड वॉरंट काढले. त्यात एकही अहवाल पोलिसांनी सादर केला नसल्याचे दाखवून दिले. मागील २५ महिन्यांपासून ती पोटगीच्या प्रतीक्षेत असल्याचेही न्यायालयाने विचारात घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षकांकडेही करण्याची सूचना केली आहे. (वार्ताहर)