शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांचं नेमकं काय?

By admin | Updated: July 25, 2015 04:34 IST

: सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत प्रवेश द्वारातही उभे करत नाही. तसेच राज्य शासनाचा

पुणे : सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत प्रवेश द्वारातही उभे करत नाही. तसेच राज्य शासनाचा आणि आमचा काहीही संबंध नाही, या आविर्भावात कामकाज करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरी त्याची अंमलबजावणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासन कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न फारसा जाणवत नाही. मात्र, शहरी भागात वाढत चाललेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना १० किलोपर्यंत वजनाचे दप्तर शाळेत घेवून जावे लागते. शासनातर्फे जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्वयंसेवी संस्थांच्या शाळांबरोबरच काही खासगी अनुदानित शाळांना कोणत्या ना कोणत्या पध्दतीने अनुदान दिले जाते. परिणामी या शाळांना शासन आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. अनुदान मिळत असल्यामुळे या शाळांना शासन आदेशानुसार दप्तराबाबत प्रसिध्द केल्या जाणाऱ्या नियमावलीची अंमलबजावणी करावी लागेल. परंतु, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळात ही अंमलबावणी करण्यात शासन अपयशी ठरेल, अशी सध्याची स्थिती असल्याचे शिक्षण क्षेत्रातील काही वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.