शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवरील कारवाईचे शहरामध्ये जल्लोषात स्वागत

By admin | Updated: September 30, 2016 04:56 IST

भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकव्यात काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे

पुणे : भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री पाकव्यात काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराच्या या कारवाईचे स्वागत करून शहरातील राजकीय पक्षांसह युवकांनी आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला. शहरातील अनेक चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी साखर तसेच पेढे वाटले, तर अनेकांनी देशभक्तीच्या घोषणा देत या कारवाईची व्याप्ती आणखी वाढविण्याची मागणी केली आहे. या वेळी चौकाचौकांत जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या जोरदार घोषणा दिल्या. डेक्कन चौक, नळस्टॉप चौक, हिंगणे चौक, स्वारगेट चौक, संत कबीर पोलीस चौकी, महात्मा फुले मंडई, बालगंधर्व चौक येथे युवकांनी जल्लोष केला. उरी येथील भारतीय ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ नष्ट करण्याची कारवाई भारतीय सैन्याने केली आहे. पतित पावन संघटनेच्या वतीने नळस्टॉप चौकात नागरिकांना साखरवाटप आणि फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरप्रमुख सीताराम खाडे, मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पू टेमघरे, दिनेश भिलारे, विनोद चौधरी, सौरभ पवार, अजय घारे, उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संत कबीर पोलीस चौकी आणि महात्मा फुले मंडईच्या परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी पेढे आणि साखर वाटप करण्यात आले. शिवसेनेचे विभागप्रमुख दत्ता जाधव, अजय परदेशी, अच्युतराव वाबळे, सुमीत जाधव यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाल महालासमोर साखर वाटून जल्लोष करण्यात आला. या वेळी राष्ट्रध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी देशभक्तिपर घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करण्यात आले. शहरात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अल्पसंख्याक संस्थांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या कारवाईचे स्वागत करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. तीत उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मेमन, हाजी गुलाम मोहंमद, आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय, महाराष्ट्र मेडिकल रिसर्च फाउंडेशन डॉ. अरीफ मेनन, अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी, मुस्लिम ओबीसी संघटनेचे नासीर खान, शब्बीर आतार, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे शाहीद इनामदार या वेळी उपस्थित होते. सिंहगड रस्त्यावर हिंगणे चौकात राजकीय पक्षांच्या वतीने साखर वाटण्यात आली. या वेळी चौकात देशभक्तिपर गीते लावण्यात आली होती. नागरिकांनीही या जल्लोषात सहभागी होऊन देशभक्तिपर घोषणा दिल्या. सूचनाफलक गजबजले : शहरातील चौकाचौकांमध्ये असलेल्या मंडळाचे सूचनाफलकही दुपारनंतर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांचे गुणगाण करणाऱ्या कवितांनी तसेच देशभक्तीच्या घोषणांनी गजबजलेले पाहायला मिळाले. तर अनेक ठिकाणी हा हल्ला आणखी तीव्र करून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी संदेशाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्यात आली.