शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उजनीमुळे पाणीबाणी

By admin | Updated: November 17, 2015 03:19 IST

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याकडे भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्याचे सत्र सुरूच राहिल्याने इंदापूरकरांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने

इंदापूर : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याकडे भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्याचे सत्र सुरूच राहिल्याने इंदापूरकरांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने बुधवारी (दि. १८) उजनी धरणाचे दरवाजे बंद करण्याची व हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.उजनी धरण शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आदी राजकीय, सामाजिक, पक्ष संघटनांचे कार्यकर्ते एकत्र झाले. सायंकाळी शासकीय विश्रामगृहात उजनीच्या पाण्यासंदर्भात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात पाणीहक्कासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याचेही ठरले.बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दशरथ माने, विजयराव शिंदे, प्रवीणभैया माने, काँग्रेसचे मंगेश पाटील, मुकुंद शहा, पंचायत समितीचे उपसभापती आबा वीर, शिवसेनेचे अ‍ॅड. नितीन कदम, शेतकरी संघटनेचे अनिल खोत यांच्यासह धरणग्रस्त भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उजनी धरण शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले, की इंदापूरकरांच्या त्यागावर उजनी धरण निर्माण झाले आहे. २८ गावे पाण्याखाली गेली आहेत. उजनीच्या पाण्यावर इंदापूरकरांचा हक्क आहे. सध्या १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाला इंदापूरकरांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तरतूद नसताना उजनी धरणातील पाणी भीमा नदीतून व सीना माढा बोगद्यातून सोलापूरसाठी सोडण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील ३४ हजार हेक्टर जमिनीस बारमाही पाणीपरवानगी होती. आजही २८ हजार हेक्टर क्षेत्रास बारमाही पाणीपरवानगी आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत जर पाणी खाली सोडण्यात आले, तर इंदापूरकरांना पाणीच शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांना आत्महत्यांशिवाय पर्याय उरणार नाही. या वेळी मंगेश पाटील, प्रवीणभैया माने, महारुद्र पाटील, अंकुश पाडुळे व इतरांची भाषणे झाली. तानाजी काळे यांनी प्रास्ताविक केले. न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्षउजनी धरणामध्ये खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा-आसखेड धरणांतून पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात येथील लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, मंगळवारी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यात यावे, अशी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे विनंती केली होती. परंतु त्याबाबत निर्णय न घेता पाणी सोडण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याने खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावर मंगळवारी निर्णय होणार आहे.