शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नदीत सोडलेले पाणीही बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ...

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाणीची तरतूद नसल्याने एक थेंबही जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी दिला आहे.

कळस (ता. इंदापूर) येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी हा इशारा दिला. पाटील म्हणाले, उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, सोलापूरला ऑक्टोबरनंतर अनधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. परंतु त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे ८० टक्के सांडपाणी हे भीमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाठपुरावा करून शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र, जलसंपदामंत्र्यांनी हीच सिंचन योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा आहे. यामुळे तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. उजनीतून इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापुरातील लोकप्रतिनिधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद पाडण्यात येणार आहे.

फोटो - कळस (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर-भिगवण रस्त्यावर शेतकरी कृती समितीच्यावतीने उजनीच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

२१०५२०२१ बारामती—२२

————————————————