शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी

By admin | Updated: November 16, 2015 02:02 IST

खडकवासला धरणातून दौंडला पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे

पुणे /दौंड : खडकवासला धरणातून दौंडला पिण्याच्या पाण्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून बाराशे क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील ६ दिवस दौंडला कॅनॉलमधून अर्धा टीएमसी पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी़ बी़ लोहार यांनी दिली़ उद्या हे पाणी दौंडला पोहोचणार आहे.दौंड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये केवळ ५५ ते ६० एमएलडी पाण्याचा साठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे दौंडसमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. त्यामुळे तातडीने दौंडसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे. कॅनॉलमधून पाटस, केडगाव, कळस, अकोलेमार्गे दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये हे पाणी जाणार आहे.दौंड शहरातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. दौंड शहराच्या बाहेरून काही किलोमीटर अंतरावरून दुचाकी, मोटारीमधून पाणी आणले जात आहे. दौंडसाठी सोडलेले पाणी तलावामध्ये पोहोचल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. दौंडला पिण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी मिळावे याकरिता पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. यंदा खूपच कमी पाऊस झाल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये पाणीकपात लागू करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. धरणांमध्ये सध्या उपलब्ध असलेले पाणी जुलै २०१६ पर्यंत म्हणजे साडेआठ महिने पुरवून वापरावे लागणार आहे. विशेषत: उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा खूपच जपून वापर करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)