शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी डाव्या कालव्याचे पाणी शिरूरला पोहोचले

By admin | Updated: May 5, 2016 04:19 IST

कुकडी प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी अखेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पोहोचले. मात्र, बंधारा पूर्ण भरला नाही. बंधारा पूर्ण भरल्यास दोन महिने पाणी पुरू शकणार आहे.

बारामती : परप्रांतीय मासेमारांना हाताशी धरून स्थानिक धनदांडगे उजनीतील मत्स्यबीजाची मोठ्याप्रमाणात शिकार करीत आहेत. परिणामी, माशांची संख्या घटत आहे. सध्या धरणाची पातळी वजा आहे. धरणाच्या अगदी पोटात झोपड्या टाकून परप्रांतीय मच्छीमार दिवसरात्र मत्स्यबीजाची शिकार करीत आहेत. यावर उजनी जलसंपदा विभाग व मत्स्यबीज विभाग मूग गिळून गप्प असल्याने स्थानिक मच्छीमार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. उजनी जलाशयात २००२ सालापासून मत्स्यबीज सोडले गेले नाही. मागील १४ वर्षांपासून मत्स्यबीजच न सोडल्याने जलाशयात फक्त चिलापी जातीचाच मासा मोठ्याप्रमाणावर आहे. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर मत्स्यबीज विभाग काँग्रेस पक्षाकडे होते. उजनी जलाशयातील मासेमारीच्या ठेक्यावरून स्थानिक कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची तेव्हा आपापसांत जुंपली होती. या वादावर तोडगा न निघाल्याने १५ वर्षांपासून उजनीत मत्स्यबीजच सोडले गेले नाही. परिणामी, पैदास जास्त असलेला चिलापी जातीचाच मासा उजनीमध्ये तग धरून आहे. दुसऱ्या जातीच्या माशांचे बीज सोडले नसल्याने ते एक तर दुर्मिळ झाले आहेत किंवा नामशेष झाले आहेत. परप्रांतीय मच्छीमार वडाप प्रकारच्या जाळ्याचा मासेमारीसाठी वापर करतात. या प्रकारच्या जाळ्यामध्ये माशांसह इतर मत्स्यबीजाचीही मोठ्याप्रमाणात शिकार केली जाते. १५ वर्षांपासून मत्स्यबीज नाही सोडलेचिलापी मासा घाण पाण्यामध्येही वाढतो. पूर्वी सापडणारे रव, कतला, मिरगळ, सफरनेस, खदराट, घोगरा, आहेर, कोळीस, वाम, मरळ आदी प्रकारचे मासे आता उजनीत सापडत नाहीत. मागील १५ वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याचा हा परिणाम आहे. मोजक्याच मच्छीमारांना परवानगी दिलीउच्च न्यायालयानेही स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्याप्रमाणे महिन्याला ५०० रुपये कराने जलसंपदा विभागाने स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही काही मोजक्याच सुशिक्षित स्थानिक मच्छीमारांना ५०० रुपये घेऊन परवाने दिले. तर, बराचशा स्थानिक अशिक्षित मच्छीमारांचे ५०० रु. घेऊन अद्याप त्यांना परवाने दिले गेले नाहीत. ही संख्या मोठी आहे. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, काही स्थानिक गावगुंडांनी परप्रांतीय मच्छीमारांना हाताशी धरून उजनीतील मत्स्यबीजाची शिकार चालवली आहे. मासे पकडण्याच्या जाळ््याऐवजी परप्रांतीयांनी चक्क मच्छरदानीचाच वापर सुरू केला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मत्स्यबीजाची शिकार होत आहे. हे सर्व मत्स्यबीज सुकवून हावडा येथील बाजारपेठेत पाठवतात. त्यातूून मोठ्याप्रमाणात माया कमवली जात आहे. या सर्व प्रकारावर उच्च न्यायालयात २ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. - चंदू भोई, अध्यक्ष, उजनी मच्छीमार बचाव अभियान