शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक विहिरीतून पाणीचोरी

By admin | Updated: June 3, 2016 00:28 IST

मारुंजीगावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतच थेट विद्युत मोटार लावून पाणी चोरी सुरू आहे. पाणी चोरीकडे डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे पाणी चोरी करणारांची

वाकड : मारुंजीगावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतच थेट विद्युत मोटार लावून पाणी चोरी सुरू आहे. पाणी चोरीकडे डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे पाणी चोरी करणारांची मुजोरी या थराला गेल्यानेच इतर ग्रामस्थांवर पाणीटंचाई झेलण्याची वेळ आली आहे. मोटारी जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. गावात सध्या नळपाणी पुरवठा योजनेतून पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळाला मोटारी लावून चोरी होण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. त्याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही आजवर कारवाईबाबत उदासीनता दाखविली गेली. आता या पाणीचोरांची मुजोरी इतकी वाढली आहे. गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरीतच दोन मोटारी टाकून पाणी उपसण्याचा प्रताप सुरू आहे. यापैकी एक मोटार एक एचपीची असून, दुसरी मोटार लपवून ठेवली आहे. सव्वा इंच पाइप लावून व्यवसायासाठीही बेसुमार पाणी उपसले जात आहे. याच विहिरीतून पाणी उपसून टाकीत टाकून लोकांना वापरण्यासाठी वितरित केले जात आहे. गावाला पाणीपुरवठा कुठून व कसा करावा याबाबत सर्वच स्तरांतून धडपड सुरू आहे. असे असताना याप्रकारे पाणीचोरी करण्याचा प्रकार म्हणजे इतर ग्रामस्थांवर अन्याय असल्याची संतापजनक भावना व्यक्त होत आहे. या पाणीचोरांवर कठोर, दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश जगताप यांनी ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)