शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यावर पाणीकपातीचे पुन्हा सावट?

By admin | Updated: March 28, 2015 23:45 IST

नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे.

पुणे : नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणार २७ मार्च अखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्ल्क असून मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठी १३़२० टीएमसी होता. मात्र, त्यानंतरही जून महिन्यापासून पुणेकरांच्या पाण्यात १२ टक्के कपात करून एकवेळ पाणी देण्यास सुरूवात केली होती. मात्र, या वर्षी मागील वर्षीपेक्षा एक टीएमसी कमी पाणी असल्याने ही कपात एक महिना आधीच लागू करण्याची भिती व्यक्त केली जात आहे. धरणांमधील पाण्याने मागील वर्षी जून २०१४ महिन्यात तळ गाठला होता. त्यातच राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूनने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे २ टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात १२ टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच नसल्याने महापालिकेने ही पाणीकपात ३५ टक्क्यांवर नेत शहरात ११ जुलै पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. या वेळी या धरणांमध्ये अवघा १.१० टीएमसी पाणीसाठा होता. मात्र १२ जुलै नंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यानंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता.