शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीगळतीचा शाळेला धोका

By admin | Updated: February 21, 2017 02:07 IST

कुंजीरवाडी येथून जाणाऱ्या बेबी कालव्यातून होणाऱ्या घाण पाणीगळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना

उरुळी कांचन : कुंजीरवाडी येथून जाणाऱ्या बेबी कालव्यातून होणाऱ्या घाण पाणीगळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणच्या कालव्यामध्ये सिमेंटचे अस्तरीकरण वा पाणी गळती थांबवणारी दुरुस्ती अद्याप पाटबंधारे विभागाने केली नसल्याची माहिती सरपंच अनुराधा कुंजीर व तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष कुंजीर यांनी दिली. कुंजीरवाडी गावच्या हद्दीमध्ये बेबी कालव्यातून झिरपणाऱ्या (नळासारख्या वाहणाऱ्या) पाण्यामुळे कालव्याच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या मैदानावर साठलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. तसेच झिरपणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील घराच्या भिंती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.प्रवाहाला अडथळा१ बेबी कालव्यावर उभारण्यात आलेले कमी उंचीचे पूल, पुलासाठी वापरलेल्या कमी व्यासाच्या नळ्या व कालव्यात वारंवार वाढणारी जलपर्णी यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. २ कालव्याच्या भरावातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याचा भराव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३ अशा वेळी लोकवस्तीच्या ठिकाणी फुटून जीवित व वित्तहानी होण्याची वाट पाटबंधारे विभाग पाहत आहे काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. सततची होणारी पाणीगळती थांबविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील उपाय न करता लोकवस्तीच्या ठिकाणी कालव्याच्या अस्तरीकराणाची मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली.

बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीची मी स्वत: पाहणी केली आहे. त्यासंदर्भातील उपाययोजना सुरू केल्या आहेत. ग्रामपंचायत कुंजीरवाडी यांच्या मदतीने पाटबंधारे विभागाच्या यंत्रणाचे काम सुरू आहे. कालव्यातील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी कालव्यात पाणी सोडणाऱ्या पंपांची चालू असलेली संख्या कमी केली आहे. कालव्यावर कायमस्वरूपी पुलाची उभारणी करण्यासाठीचे अंदाजपत्रक काढून त्यासंदर्भातील निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन महिन्यांमध्ये नवीन पुलाची कामे सुरू होतील.- बी. डी. थोरात, उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग