शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता उल्लंघनावर व्हिडीओची नजर

By admin | Updated: January 13, 2017 03:12 IST

निवडणूक आयोगाच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर

पिंपरी : निवडणूक आयोगाच्या वतीने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागाची करडी नजर राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांचे व्हिडीओ निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नागरिकांना अपलोड करण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आचारसंहिता जारी झाल्यानंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नियोजन केले. या संदर्भातील माहिती देताना आयुक्त म्हणाले, ‘‘२१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठीचे नियोजन केले आहे. या संदर्भातील आढावाही घेण्यात आला आहे. बहुसदस्यीय पद्धतीने ही निवडणूक होणार असून ३२ प्रभाग असणार आहेत. तसेच ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्त्ी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार होणार आहेत. यासाठी सुमारे वीस कक्ष कार्यान्वित केले आहेत. नियोजनानुसार १२ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे. यावरील हरकतींसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रभागनिहाय विभाजन केलेली मतदार यादी २१ जानेवारीला प्रकाशित केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यासाठी ट्रू वोटर अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपची मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत होणार आहे. तसेच उमेदवारांना शपथपत्राद्वार भरलेली माहिती पाहता येणार आहे. तसेच दैनंदिन खर्चही सादर करता येणार आहेत. शहरातील राजकीय पक्ष उमेदवारांच्या संबंधित फलक, बॅनर काढून टाकण्यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना आदेश दिले आहेत. या संदर्भात भोसरीतील एक तक्रारही आली होती. त्या संदर्भात शहनिशा करण्याचे काम सुरू आहे.निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी परिमंडळ तीनचे उपायुक्त, तसेच पोलीस ठाण्यांनाही माहिती कळविण्यात आली आहे. पत्रव्यवहार केला आहे. आचारसंहितेसंदर्भात तक्रार आल्यास सुरूवातीला पोलीस आणि भरारी पथकाला कळविण्यात येईल. ’’(प्रतिनिधी)निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. विविध उपाययोजना करण्यात आल्या असून आचारसंहिता कक्षाची स्थापना झाली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ सर्व्हिलन्स पथक नियुक्त केले जाणार आहे. - दिनेश वाघमारे, आयुक्त