शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

एफडीओ कार्यालयावर सीसी टीव्हीचा वॉच

By admin | Updated: May 21, 2014 00:25 IST

अन्नधान्य पुरवठा विभागाची शहरातील सर्व परिमंडळ कार्यालये सीसी टीव्हीच्या नजरेत येणार आहेत. परिमंडळ कार्यालयातील एजंटगिरीला आळा घालण्यासाठी तसा प्रस्ताव करण्यात आला

पुणे : अन्नधान्य पुरवठा विभागाची शहरातील सर्व परिमंडळ कार्यालये सीसी टीव्हीच्या नजरेत येणार आहेत. परिमंडळ कार्यालयातील एजंटगिरीला आळा घालण्यासाठी तसा प्रस्ताव करण्यात आला असल्याची माहिती अन्न पुरवठा अधिकारी (एफडीओ) धनाजी पाटील यांनी दिली. येरवडा, निगडी, मंडई, आंबिलओढा येथील कार्यालयांत प्रत्येकी एक व शिवाजीनगर गोदामातील चार परिमंडळ कार्यालयांत सीसी टीव्ही बसविण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीने त्याचे ठिकाण निश्चित करण्यात येईल. कार्यालयाच्या परिसराबरोबर कार्यालयातदेखील कॅमेरा बसविण्यात येणार आहे. एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन शिधापत्रिका काढणे, जुने कार्ड बदलून नवीन घेणे, शिधापत्रिकेत नवी नावे जोडणे अथवा नावे कमी करण्यासाठी नागरिकांना परिमंडळ कार्यालयाचा आसरा घ्यावा लागतो. ही कामे महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातूनही होत आहेत. मात्र, कामे जलद करून देण्यासाठी एजंटांची एक साखळीच सर्व परिमंडळ कार्यालयात कार्यरत असल्याचे उघड गुपित आहे. एजंटांशिवाय कोणतेही काम होत नसल्याचे चित्र असून, तशा काही तक्रारीदेखील एफडीओ कार्यालयाकडे दाखल झालेल्या आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी ‘ह’ परिमंडळ कार्यालयातून बोगस शिधापत्रिका दिल्याचा प्रकारदेखील ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगानेदेखील मतदान बूथवर ओळखपत्र म्हणून शिधापत्रिका ग्राह्य धरू नये, असा निर्णय घेण्यात आला होता. एफडीओ कार्यालयाने या प्रकरणी संबंधित अधिकार्‍याची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वीदेखील शिवाजीनगर, येरवडा व आंबिलओढा अशा कार्यालयांत एजंटांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापूर्वीचे एफडीओ ज्ञानेश्वर जवंजाळ यांनीदेखील शिवाजीनगर गोदामातील परिमंडळ कार्यालयातील एजंटांना हटवावे, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. तर, शहराला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. काही संशयित दहशतवाद्यांकडे बोगस शिधापत्रिका आढळून आल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिका काढण्यास येणार्‍या संशयित व्यक्तींची नावे कळवावीत, असे पत्र गेल्या वर्षी पोलिसांनी एफडीओ कार्यालयाला दिले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर एजंटगिरीला आळा घालण्यासाठी सीसी टीव्हीची मदत घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)