--
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील गेल्या अनेक दिवस दिवसांपासून प्रलंबित असणारा शिक्रापूरचा कचराप्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने शिक्रापूर ग्रामपंचायतीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कचरा संकलन करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार असून, रोजच्या रोज जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासन सर्व कचरा घंटागाडीने जमा करून गावाजवळील नदीपात्राच्या कडेला टाकत होते. या साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी तर येत होतीच, परंतु अनेक वेळा या कचऱ्यास आग लागून सर्व गावांत धूरदेखील येत होता. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. नुकतेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन व ग्रामस्थांनी एकत्र येत हा प्रश्न मार्गी लागल्याची घोषणा केली. त्यानुसार कचरा विलगीकरण करण्यासाठी एक ठेकेदार नेमण्यात आला असून, रोजच्या रोज जमा होणारा कचरा विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे ठरले आहे. काही प्रशासकीय प्रक्रिया, जुजबी काम करून ताबडतोब प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. या समस्येला सामोरे जाताना शिक्रापूरकारांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज, विनंत्या केल्या होत्या. काही वेळा आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला होता. परंतु सर्व सदस्यांनी कारभार हातात घेतल्यावर कचरामुक्त शिक्रापूरचा विडा उचलला अन् प्रथम तळेगाव दाभाडे येथील कचरा प्रकल्पास भेट दिली. त्यानंतर खऱ्या अर्थाने या कामास गती मिळाली.
या वेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, रमेश थोरात, विशाल खरपुडे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सारिका सासवडे, वंदना भुजबळ, मोहिनी संतोष मांढरे, पूजा भुजबळ, मोहिनी युवराज मांढरे, उषा राऊत, शालन राऊत, सीमा लांडे, कविता टेमगिरे, कृष्णा सासवडे, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे, युवा कार्यकर्ते प्रशांत उबाळे, जितेंद्र काळोखे, आकाश जाधव, कचरा ठेकेदार परवेज शेख आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०८ शिक्रापूर कचरा समस्या
फोटो ओळी : शिक्रापूर येथील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जागेची पाहणी करताना ग्रामस्थ.
===Photopath===
080621\08pun_4_08062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : ०८ शिक्रापूर कचरा समस्या फोटो ओळी : शिक्रापूर येथील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जागेची पहाणी करतांना ग्रामस्थ