शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वारज्यात टोळक्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 6, 2016 00:53 IST

आपसांतील वादामधून दोन टोळक्यांनी वारज्यातील विठ्ठलनगर आणि म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. निरपराध नागरिकांच्या घरांची आणि वाहनांची

कर्वेनगर/वारजे : आपसांतील वादामधून दोन टोळक्यांनी वारज्यातील विठ्ठलनगर आणि म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. निरपराध नागरिकांच्या घरांची आणि वाहनांची तोडफोड करून या टोळक्याने माजवलेल्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांत वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना वाढल्या असून, नागरिकांना सुरक्षा पुरवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. वारजे पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संभाजी सीताराम पिंपरे यांच्या फिर्यादीवरून रोहित पासलकर, मंदार ऊर्फ मन्या जोशी, संकेत शिंदे, अक्षय जाधव यांच्यासह १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दत्तात्रय किसन जोरी (वय ३९, रा. म्हाडा वसाहत) यांच्या फिर्यादीवरून सूरज पिंपरे, नेहाल शिंदे, जावेद पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागामध्ये सध्या पिंपरे आणि पासलकर या दोघांच्या टोळ्या डोके वर काढत आहेत. वर्चस्वाच्या वादामधून या दोन टोळ्यांमध्ये सतत वादविवाद होत असतात. या दोन्ही टोळ्यांमध्ये शनिवारी रात्री पुन्हा वाद झाला होता. पिंपरे आणि त्याच्या टोळीने म्हाडा वसाहतीमध्ये घुसून जोरी यांच्या घरावर दगडफेक करायला सुरुवात केली. बेभान झालेल्या या टोळक्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. मोठमोठ्याा आवाजात शिवीगाळ आणि आरडाओरडा करीत हे टोळके पसार झाले. त्यानंतर काही वेळातच या घटनेची माहिती पासलकरला मिळाली. त्याने साथीदारांची जमवाजमव केली. विठ्ठलनगर परिसरात घुसलेल्या पासलकरच्या टोळीने हातामध्ये दांडके, कोयते नाचवत आरडाओरडा करीत नागरिकांना शिवीगाळ सुरू केली. तेथे उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात करताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पासलकरवर गुन्हे दाखल असून, तो यापूर्वी तडीपारही होता. पिंपरे यांच्या घरासमोरच्या मोटारी, टेम्पोच्या काचा फोडत हे टोळके आरडाओरडा करीत दुचाकीवरून पसार झाले.