शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षणाचा मातब्बरांना फटका

By admin | Updated: July 3, 2016 03:52 IST

लोणावळा नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी शनिवारी प्रभागवार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या.

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी शनिवारी प्रभागवार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग रचनेच्या याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या. आरक्षण सोडतीमध्ये खंडाळा, जुना खंडाळा, लोणावळा गावठाण, वलवण, तुंगार्ली, इंद्रायणीनगर या भागात सर्वसाधारणसाठी जागाच नसल्याने येथील प्रबळ दावेदार तसेच प्रस्थापित यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. भांगरवाडी विभागात दोन व गवळीवाडा विभागात दोन जागा सर्वसाधारणसाठी आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नगर परिषदेच्या लोकसंख्येनुसार या वर्षी एक वॉर्ड वाढल्याने वॉर्ड संख्या २५ झाली असून, प्रभाग रचनेनुसार २ वॉर्डाचे ११ प्रभाग व ३ वॉर्डाचा मिळून एक असे १२ प्रभाग करण्यात आले आहेत. (वार्ताहर)प्रभाग क्र. १ : न्यू तुंगार्ली - इंदिरानगर : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. २ : तुंगार्ली गावठाण : अ : ओबीसी, ब : सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ३ : वलवण : अ) एससी, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ४ : नांगरगाव-भांगरवाडी : अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. ५ : भांगरवाडी : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. ६ : नगरपालिका कार्यालय - इंद्रायणीनगर : अ) ओबीसी, ब) सर्वसाधारण महिला.प्रभाग क्र. ७ : आगवाला चाळ/रेल्वे विभाग : अ) एससी महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. ८ : गवळीवाडा) : अ) ओबीसी महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. ९ : खंडाळा : अ) एसटी, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. १० : जुना खंडाळा : अ) ओबीसी, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ११ : लोणावळा गावठाण : अ) एससी, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. १२ : भुशी, रामनगर, हुडको : अ) एससी महिला, ब) ओबीसी महिला, क) सर्वसाधारण.