शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

वालचंदनगरला सलग ९ तास मुसळधार पाऊस

By admin | Updated: June 14, 2017 03:58 IST

परिसरात १० वर्षांनंतर प्रथमच ९ तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने तहानलेल्या जमिनी ओव्हरफ्लो झाल्या. नदी, नाले, ओढ्यांना दहा-बारा वर्षांनंतर पावसाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : परिसरात १० वर्षांनंतर प्रथमच ९ तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने तहानलेल्या जमिनी ओव्हरफ्लो झाल्या. नदी, नाले, ओढ्यांना दहा-बारा वर्षांनंतर पावसाच्या पाण्याने पूर आला. शेतात पाणी दोन फूट पाणी साठल्याने खरिपाची पेरणी लांबण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागावर वरून राजाने कृपा केल्याने दहाबारा वर्षात सर्वात जास्तचा ९ तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. सर्व शिवारच जलमय झालेले दिसत आहे. काल दुपारी ३ वाजता मुसळधार पावसाने सुरूवात झाली. शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. पुन्हा सायंकाळी ६ वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दोन वाजेपर्यंत पावसाने विश्रांती न घेतल्याने सर्वत्र ओढे, नाले, नद्यांना पाणी आले. जोरदार पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला गेला. परंतु दरवर्षी पाऊस न पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबून जायच्या. मात्र या ९ तास मुसळधार पावसाने १५ दिवस जमिनीस वाफसा येणार नसल्याने पेरण्या लांबणीवर जाण्याच्या शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. वालचंदनगर परिसरात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर सलग पाऊस सुरू होता. २ तास मुसळधार बरसला. या पावसामुळे तालुक्यातील लहानमोठ्या शेतकऱ्यांना फायदा झाला. जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. खरीपाच्या पेरणी वेळेवर होऊन उत्पादनात कमालीचा भर पडतो. २००६ साली सांगली शहर ज्यावेळी पाण्यात बुडाले होते त्यावेळी असा जोरदार पाऊस पडला होता. २०१२ साली जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांना भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आलेली होती. त्या सालापासून आजपर्यंत वेळेवर पाऊस पडलाच नव्हता.वालचंदनगरमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांना तळ््याचे स्वरुप आल्याचे दिसून आले होते. शाळा परिसर व इतर ठिकाणीही पाणी साचलेले होते.