शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना पिठलं-भाकरीची मेजवानी

By admin | Updated: July 3, 2016 03:46 IST

श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या खास पसंतीची पिठलं-भाकरीची मेजवानी देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी एक

यवत : श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या खास पसंतीची पिठलं-भाकरीची मेजवानी देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी एक ते दीड लाख भाकरी व दीड हजार किलोचे पिठले बनवले होते.पुणे व शहरी परिसरातील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात प्रवेश करतो, तो यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात. दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम असतो. मागील अनेक वर्षांपासून यवतमधील ग्रामस्थ श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी चांगली व्यवस्था ठेवत आले आहेत. यातील एक वेगळा आणि वारकऱ्यांचा आवडता विषय म्हणजे येथील मुक्कामात वारकऱ्यांना मिळणारी मेजवानी. संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. देहू येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पहिले काही मुक्काम शहरी परिसरात असल्याने तेथेही वारकऱ्यांना चांगली मेजवानी दिली जाते. मात्र यवत मुक्कामी ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी पिठले-भाकरीची मेजवानी असते. यामुळे वारीत कधी घरातल्याप्रमाणे जेवणाचा आनंद घेता येतोय, याची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. यवतमध्ये पिठलं-भाकरी तयार करण्याची देखील अनोखी प्रथा आहे.यवतच्या पिठलं-भाकरीची चव महाराष्ट्रात प्रसिद्धसंत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात यवत मुक्कामी वारकऱ्यांना दिली जाणारी पिठलं-भाकरीची मेजवानी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांमधून येणारे हजारो नागरिकदेखील पिठले भाकरीचा आस्वाद घेऊनच जात असतात. आज (दि. २) मंदिरात पिठले भाकरीची तयारी सुरू असताना पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनादेखील याचे कुतूहल वाटले. त्यांनी तत्परतेने त्यांनी मोबाईलमध्ये पिठले तयार करतानाचे चित्रीकरण केले.