शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नावनोंदणी ८ आॅक्टोबरपासून

By admin | Updated: October 1, 2015 00:39 IST

भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १ आॅक्टोबरऐवजी आता ८ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.

पुणे : भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात १ आॅक्टोबरऐवजी आता ८ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेनंतर पुढील वर्षी १६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, हीच यादी आगामी महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने तब्बल ३ लाख १६ हजार मयत, स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे यादीतून कमी केली आहेत. त्यामुळे या नवीन मोहिमेमध्ये एखाद्या मतदाराने नाव कमी झाले असेल, तर त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या याद्याच आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक जागृकपणे या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी समिक्षा चंद्राकार यांनी केले. (प्रतिनिधी)----------------जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये असलेल्या चुकांमुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. यामुळे हजारो लोकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी ही विशेष पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये नव्याने नाव दाखल करणे, नाव, पत्ता दुरुस्त करणे, दुबार नाव कमी करणे आदी अनेक कामे करण्यात येणार आहे. यासाठी ८ आॅक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, या यादीवर ७ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणे, ३० नोव्हेंबरपर्यंत दावे निकाली काढणे, २४ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन याद्या अद्ययावत करणे आणि पुढील वर्षी १६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.---------------राज्य निवडणूक आयुक्तांची पुण्यात आढावा बैठकआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ आॅक्टोबरपासून संपूर्ण राज्यात विशेष पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच यादी जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया पुणे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांची येत्या ३ आॅक्टोबरला पुण्यात आढावा बैठक घेणार आहेत.