शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची आता खरी परीक्षा

By admin | Updated: February 14, 2017 02:12 IST

महापालिका निवडणुकीत इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या गेल्याने अनेकांनी पक्षांतरे केली़ त्यामुळे कोण कोणत्या

पुणे : महापालिका निवडणुकीत इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्या गेल्याने अनेकांनी पक्षांतरे केली़ त्यामुळे कोण कोणत्या पक्षात हे अजूनही मतदारांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाही़ दुसरीकडे प्रभाग पद्धतीमुळे पुणेकरांना एकाचवेळी चार जागांसाठी मते देण्याची वेळ प्रथमच आली आहे़ हे कमी असतानाच एकाच प्रभागात एकाच आडनावाचे चार ते पाच उमेदवार रिंगणात उतरले आहे़ ४१ पैकी १५ प्रभागात एकाच आडनावाचे अनेक उमेदवार रिंगणात आहेत़ त्याशिवाय काही प्रभागातील जागांवर तर उमेदवारांचे नाव आणि आडनावही सारखे आहे. त्यामुळे आपण ठरविलेल्या नेमक्या त्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांनाच खरी परीक्षा द्यावी लागणार आहे़ चारचा प्रभाग केल्याने यंदा प्रत्येकालाच चार जागांसाठी मतदान करायची संधी मिळाली आहे़ प्रभागातील अ गटातील नावे संपल्यानंतर एक जागा कोरी ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर त्याखालीच ब गटातील व त्यानंतर क व ड गटातील उमेदवारांची नावे असणार आहेत़ त्यामुळे एका मशिनवर दोन गटातील उमेदवारांची नावे येणार आहेत़ कळस -धानोरी प्रभाग क्रमांक १ मध्ये टिंगरे आडनाव असलेले ५ उमेदवार रिंगणात आहेत़ फुलेनगर - नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २ मध्ये तीन शेख उमेदवार आहेत़ खराडी -चंदननगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये पठारे आडनाव असलेले एकूण ६ उमेदवार उभे आहेत़ वडगाव शेरी -कल्याणीनगर या प्रभाग क्रमांक ५ मधून ५ गलांडे रिंगणात उतरले आहेत़ येरवडा प्रभाग क्रमांक ६ मध्ये तीन देवकर आडनाव असलेल्या महिला निवडणूक लढवत आहेत़ औंध -बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून प्रत्येकी तीन गायकवाड आणि कांबळे रिंगणात उतरले आहेत़ बाणेर -बालेवाडी, पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निम्हण आडनाव असलेले तिघे उभे आहेत़ ताडीवाला रोड -ससून हॉस्पिटल प्रभाग क्रमांक २० मध्ये तीन शेख तसेच तीन शिंदे निवडणूक लढवत आहेत़ वानवडी प्रभाग क्रमांक २५ मध्ये चार जगताप आडनाव असलेले उमेदवार उभे आहेत़ कोंढवा -मिठानगर प्रभाग क्रमांक २७ मध्ये शेख आडनाव असलेले ५ उमेदवार रिंगणात आहेत़ आंबेगाव -दत्तनगर प्रभाग क्रमांक ४० मधील अ गटात तीन बेलदरे आडनावाचे उमेदवार असून, एकूण चार बेलदरे या प्रभागात निवडणूक लढवत आहेत़ कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४१ मध्ये चार कामठे आडनाव असलेले उमेदवार निवडणूक लढवत आहेत़(प्रतिनिधी)