शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

भाविकांना आस ज्ञानोबा-तुकोबांच्या भेटीची

By admin | Updated: July 2, 2016 12:49 IST

जगद्गुरू तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. १ जुलै) हडपसर येथे सकाळच्या न्याहारीसाठी येत आहे.

हडपसर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. १ जुलै) हडपसर येथे सकाळच्या न्याहारीसाठी येत आहे. पालखीच्या स्वागतासाठी; तसेच वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी हडपसरवासीयांनी जय्यत तयारी केली आहे. गाडीतळाजवळ दोन्ही पालख्यांचा विसावा असतो.शुक्रवारपासून विविध पालख्या येथून पंढरपूरच्या दिशेने जातात. वारकऱ्यांच्या रांगा पहाटेपासूनच लागल्या आहेत. त्यामुळे हा परिसर भक्तिमय झाला आहे. प्रशासनाबरोबर नागरिकांनी संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालखीचे दर्शन घेताना स्वयंशिस्त पाळली पाहिजे. गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरांचे फावते. त्यामुळे महिलांनी मौल्यवान दागिने घालू नयेत. गर्दी करून गोंधळ करण्यापेक्षा रांगेतून दर्शन घेतले तर सर्वांना सोयीचे होईल. यासाठी प्रत्येकाने स्वत:च काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. भैरोबानाला ते सत्यपुरम या मार्गावर ज्ञानेश्वरमहाराजांच्या व भैरोबानाला ते मांजरी फार्मपर्यंत तुकाराममहाराजांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांना स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पालखी व वारकऱ्यांना दोन्ही मार्गांवरून जाताना कुठलाही अडथळा येणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी नागरिकांनी घेतली आहे.ठिकठिकाणी उभारले स्वागत कक्षज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा या वर्षी गाडीतळावरील पीएमपी थांब्यात सकाळी होईल. दर्शनासाठी रांगांची व्यवस्था केली आहे. मंडप उभारण्यात आला आहे. तर, दर वर्षीप्रमाणे तुकाराममहाराजांच्या पालखीचा विसावा पूर्वीच्या ठिकाणीच असेल. अनेक सामाजिक संस्था, मंडळे यांनी स्वागत कक्ष उभारले आहेत. आरोग्य शिबिर, औषधे, फराळ वाटपासाठी येथील रहिवाशांनी तयारी केली आहे.