शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी टोलवसुली केली बंद

By admin | Updated: February 13, 2017 01:32 IST

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर आकारणी सुरू करण्यात येणार होती...

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर आकारणी सुरू करण्यात येणार होती, संतप्त ग्रामस्थांनी टोलनाक्यावरील वसुलीचे काम बंद पाडले.राजगुरुनगर ते सिन्नर यादरम्यान चौपदरी रस्त्यावर काम करण्यात आले असून या महामार्गावर जुन्नर तालुक्यात चाळकवाडी आणि संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसाळ्यात या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या करारपत्रकानुसार दि. ३१ जानेवारी रोजी १०४.६३६ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण झाला असल्याबाबतचे पत्र संबंधित यंत्रणेकडून मिळाले असल्यामुळे व्यावसायिक वापरासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने पथकर वसुली करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर वसुलीसाठी सुरुवात करण्यात येणार होती. परंतु अद्याप आळेफाटा बाह्यवळण रस्ता, सद्गुरुनगर व पिंपळवंडी बसस्टँड येथील उड्डाणपूल, आळे येथील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्ती अशी अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत, त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. स्थानिकांनी पथकर आकारण्यात येऊ नये, टोलनाक्यावर स्थानिक तरुणांना नोकरी देण्यात यावी आदी मागण्या करीत शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन पथकर वसुली करण्यास हरकत घेतली. टोलनाक्याच्या सजावटीसाठी लावलेले फुगे व हार तोडण्यात आल. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी मध्यस्थी करीत नागरिकांना शांत केले. याबाबत भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. (वार्ताहर)