सासवड : पुरंदर तालुक्यासाठी गुंजवणी धरणातून बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना असून, नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी जलसंपदा विभागाकडे तत्त्वत: मान्यतेसाठी पाठविली आहे, अशी माहिती आमदार विजय शिवतारे यांनी सासवड येथे पत्रकार परिषदेत दिली.
वीर धरणामध्ये येणारे गुंजवणी धरणाचे 2 टीएमसी पाणी पुरंदरसाठी राखीव आहे. हे पाणी पुरंदरला मिळावे, यासाठी शिवतारे यांनी शासनाकडे पुरंदर कृषी संजीवनी योजना सादर केली होती. यासाठी सासवड येथे उपोषण केले होते. उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या
बैठकीत इतर मंत्र्यांनी वीर धरणातून पाणी देण्यास विरोध केला व पाण्यासाठी दुसरा पर्याय सुचविण्यास सांगितले. यातूनही सुधारित योजना तयार करण्यात आल्याचे शिवतारे म्हणाले.
वेल्हा तालुक्यातील 485 हेक्टर व भोरमधील 5985 हेक्टर जमिनीला लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे क:हा नदीच्या दक्षिणोकडील सर्व गावांना लाभ होईल. या गावांना सध्या कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही. गुंजवणी धरणाच्या पाण्यातून नाझरे, पिलाणवाडी घोरवडी धरणात दुष्काळाच्या काळात पाणी सोडता येईल, अशी सोय आहे.
बंद पाइपलाइनमुळे जमीन अधिग्रहणाचा प्रश्न येणार नाही लाभ क्षेत्रत वाढ होईल, असे शिवतारे यांनी सांगितले. या योजनेसाठी आपण मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्यासह 8-9 बैठका घेतल्या.
विधानसभेत तारांकित प्रश्न, स्थगन प्रस्ताव, कपात सूचना, लक्षवेधी इत्यादी सर्व प्रकारांचा वापर केला. आता नीरा देवधर प्रकल्पाच्या अधिक:यांनी ही योजना जलसंपदा विभागाकडे पाठविली आहे.(वार्ताहर)
4गुंजवणी धरणातून पाइपलाइन टाकून पाणी आणायचे, दिवले येथून पाणी उचलून नारायणपूर येथे आणायचे व तालुक्यात वितरण करायचे, अशी योजना आहे. यासाठी 96 किलोमीटर पाइपलाइन टाकावी लागणार आहे. योजनेचा अंदाजे खर्च 3क्6 कोटी रुपये आहे. दिवले प्रमाणोच हरगुडेपासून पाणी कांबळवाडी येथे येईल व तेथून सायफन पद्धतीने राख, वाल्हे गावापयर्ंत जाईल. या पाण्याचा फायदा तालुक्यातील 3क् हजार एकर क्षेत्रस होईल.
पुरंदर कृषी संजीवनी योजनेत पाणी उचलण्याचे दोन टप्पे आहेत.
टप्पा क्रमांक 1 दिवले अंतर्गत येणारी गावे पुढीलप्रमाणो : नारायणपूर, पोखर, नारायण पेठ, भिवडी, चांबळी, हिवरे कोडीत, सासवड.
वाढीव हद्दीतील मळे : खळद, रासकर मळा, कुंभार वळण, एखतपूर, मुंजावाडी, खानवडी, वाळुंज, निळुंज, शिवरी, जेजुरी
ग्रामीण टप्पा क्रमांक 2 कांबल वाडी : पांगारे, शिंदेवाडी यासह वाल्हे, राखगाव पयर्ंतची सर्व गावे.
वीर धरणाऐवजी थेट गुंजवणी धरणातून पाणी आणण्याची योजना आपण चिकाटीने व धडाडीने मार्गी लावून पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू.-विजय शिवतारे, आमदार