शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विजय शिवतारेंच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल, भावांवर आरोप, शिवतारे यांच्या पत्नीचाही व्हिडीओद्वारे खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST

जेजुरी: पुरंदरचे सेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुलीने आज पहाटे ३ वाजता मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयातून एक धक्कादायक ...

जेजुरी: पुरंदरचे सेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुलीने आज पहाटे ३ वाजता मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयातून एक धक्कादायक पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. या पोस्टमधून शिवतारेंच्या घरातील कलह समोर आला. तिने आपल्या भावांवर गंभीर आरोप केले आहेत. तर मुलीच्या पोस्टनंतर शिवतारेंच्या पत्नीनेही व्हिडीओ पोस्टद्वारे मुलीचे आरोप खोडून काढले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यात मात्र मोठी खळबळ माजली आहे.

पुरंदर मतदार संघाचे दोन वेळा नेतृत्व करणारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना त्यांची मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे यांनी फेसबुकवरून एक भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी भाऊ विनय आणि विनस हे दोघेजण संपत्तीसाठी आपल्या वडिलांचा मानसिक छळ करीत आहेत. संपत्तीच्या हव्यासापोटी भाऊ विनय हा कौटुंबिक वादातून वडिलांची बदनामी करीत आहे. गेल्या दीड वर्षापासून वडील विजय शिवतारे दिवसाआड डायलिसिसला जात आहेत. या काळात माझ्या दोन्ही भावांनी त्यांची साधी विचारपूस ही केली नाही. उलट त्यांच्या आजारपणाचा फायदा घेत त्यांचा मानसिक छळ करीत आहेत. वडिलांची सगळी संपत्ती विनय आणि विनस यांच्या कुटुंबीयांच्या नावाने करून दिलेली आहे. तरी ही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी दबाव टाकत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियाद्वारे बदनामी करून दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बदनामीच्या धमक्या देऊन मानसिक त्रास देत आहेत. असे आरोप करीत ममता यांनी गेल्या सत्तावीस वर्षांपूर्वी १९९४ साली जे घडले ते सत्य असो अथवा असत्य आज त्या का उकरून काढाव्यात ? वडिलांचा द्वेषच होता तर तो याकाळात का व्यक्त नाही केला. आताच का असे? वडिलांची संपत्ती नावावर करून घेतली पण स्वतःचे स्वकर्तृत्व काय? मृत्यूशय्येवर असताना मुलांनी असे वागणे योग्य आहे का? असे प्रश्न ही सार्वजनिक करून भावनिक पोस्ट लिहिली आहे.

ममता लांडे यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, लगेच शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी ही व्हिडीओ पोस्टद्वारे आपल्या मुलीने डॉ. ममताने मुलांवर केलेले सर्व आरोप धांदात खोटे आहेत. उलट गेल्या २७ वर्षांपासून पती वेगळे राहत आहेत. पती शिवतारे सुरुवातीचे पाच वर्षे उज्ज्वला बागवे यांच्याशी लग्न करून राहत होते. त्यानंतर आजतागायत ते मीनाक्षी पटेल यांच्यासोबत पवई येथे राहत आहेत. उलट पती विजय शिवतारे यांचा मानसिक छळ होऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे. अशी पोस्ट केली आहे. सोशल मीडियाद्वारे शिवतारे यांच्या घरातील कलह जगजाहीर झाल्याने पुरंदर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी घरगुती कलह असल्याचे म्हटले आहे. मात्र तो संपुष्टात येईल अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असलेले विजय शिवतारे.