शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- कैद्यांनी चढवला कारागृहाच्या भिंतींना रंगीत साज

By admin | Updated: August 28, 2016 21:11 IST

कैद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येत असतात.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - कैद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. अशाच उपक्रमाचा भाग म्हणून काही एनजीओंच्या मदतीने येरवडा कारागृहातील कैद्यांनी कारागृहाच्या भिंतींना सुंदर साज चढविला आहे.

कारागृहातील भिंतींवर विविध संतांची चित्रे काढण्यात आली असून विविध सामाजिक संदेश देत कैद्यांच्या जाणिवा जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये अनेकजण उत्तम चित्रकार आहेत. त्यांच्याकडील कलेला वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन अतिरीक्त महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेमधून करण्यात आले आहे. वानरसेना एनजीओ आणि इंडीगो पेंट्स यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या उपक्रमात कैद्यांनीही हिरीरीने भाग घेतला. कारागृहातील काळवंडलेल्या भिंतींना एक नवा साज चढवित या भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. एका भिंतीवर पुस्तकात डोकावणारा मेंदू चितारण्यात आला असून या पुस्तकवृक्षाच्या फांद्या ज्ञानदीप लावत असल्याचे चित्र रंगवण्यात आलेले आहे.

यासोबतच संत तुकाराम यांचे चित्र लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. तुकारामांच्या ह्यशुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटीह्ण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही वचने रंगवण्यात आली आहेत. तसेच आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना,  नारी का करो सम्मान, तभी होगा राष्ट्र महानह्ण,  गालीब उम्रभर एक भूल करता रहा, धूल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा, असे सामाजिक संदेश अक्षररुपाने साकारण्यात आले आहेत.  भूक आहे तेवढे खाणे म्हणजे प्रकृती, पोटापेक्षा अधिक खाणे ही विकृती, अन दुस-याला खायला देणे म्हणजे संस्कृती हा संदेश विशेष लक्षवेधी ठरत आहे. हा उपक्रम राज्यातील अन्य कारागृहांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उपाध्याय यांनी दिली.