शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - शिक्षणासाठी 'त्यांना' रोज पार करावी लागते नदी

By admin | Updated: October 14, 2016 20:22 IST

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून रोजच जीवघेणा प्रवास करत आहेत.

ऑनलाइन लोकमत 
डेहणे, दि. १४ -  एकीकडे डिजीटल शिक्षणासाठी प्रसार, प्रचार जोरात चालू आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांसाठी पायाभूत सुविधा मिळणे, समस्या सुटण्यास मुहूर्त लागत नाही. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली. तरीही या आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबीतच आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून रोजच जीवघेणा प्रवास करत आहेत. 
मागील १५ वर्षांपासून ग्रामस्थ साकव पुलाची मागणी करत आहे. मात्र अद्यापही त्यांच्या या मागणीला राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. हे विद्यार्थी धामणगावहून शिक्षणासाठी डेहणे (ता. खेड) येथील महाविद्यालयात अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करून येतात. भीमा नदीच्या पलिकडे असणा-या गावांना धरणाचे विस्तीर्ण पाञ होडीनेच पार करावे लागत आहे. कायम धरणात पाणी असल्याने फक्त उन्हाळ्यात एखादा महिना सोडल्यास बाकी हा जीवघेणा प्रवास आता रोजचा झाला आहे. 
एकलहरे, धामणगावचे ग्रामस्थ या चासकमान धरणामुळे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. दळणवळणासाठी पलीकडे जाण्याचा जवळचा मार्ग नसल्याने ग्रामस्थ डेहणे येथे जाण्यासाठी होडीचा वापर करतात. 
 
फुटलेल्या होड्यांमधून धोकादायक वाहतूक 
जिल्हा परिषदेच्या ह्या होड्याही खूप जुन्या झालेल्या आहेत. पावसाळ्यात या होड्यामंध्ये पाणी साठते. पर्यायी व्यवस्था नसल्याने ह्याच फुटलेल्या होड्यांमधून विद्यार्र्थी प्रवास करतात. होडी चालवण्याचा लिलाव कोणालाही दिला नसल्याने महिला, मुले ही होडी चालवतात. सव्वाशे मीटरपेक्षा जास्त रुंद पाञ असल्याने चालवणाराची दमछाक होते. त्यामुळे लिलाव घेण्यासाठी कोणी तयार होत नाही. 
 
पालक सतत चिंतेत 
धामणगावच्या होडीत सकाळी शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची गर्दी होते. चालवणारा नसेल तर ही मुलेच होडी पैलतीरी नेतात. गेल्या वीस वर्षांपासून जीव धोक्यात घालून प्रवास चालू आहे. शाळेतून मुले घरी परत येईपर्यत पालक चिंतेत असतात.