शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रोहीतराज युवा क्रिकेट अकादमी, लिजंड्स स्पोर्ट्सचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लिजंड्स स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित ‘लिजंड्स करंडक’ आंतर क्लब (१४ आणि १६ वर्षाखालील गट) टी-२० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लिजंड्स स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित ‘लिजंड्स करंडक’ आंतर क्लब (१४ आणि १६ वर्षाखालील गट) टी-२० स्पर्धेत रोहितराज युवा क्रिकेट अकादमी आणि लिजंडस् स्पोर्ट्स क्लब संघांनी विजय मिळवले.

मुंढव्याच्या चंचलाताई संदीप कोद्रे क्रीडा संकुलातील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आदित्य वाघमारे याच्या कामगिरीच्या जोरावर रोहितराज युवा क्रिकेट अकादमीने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा ३ गडी राखून पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने १९ षटकांत ८ गडी गमावून ९९ धावा केल्या. यात रूद्रप्रताप सिंग (२७ धावा) व स्वराज बंदीचड (१५ धावा) यांनी संघाला ९० धावांचा टप्पा गाठून दिला. हे आव्हान रोहितराज युवा क्रिकेट अकादमीने १९ षटकांत व ७ गडी गमावून पूर्ण केले. आदित्य वाघमारेने ३३ धावा फटकावून विजयात मोलाचा वाटा उचलला.

१६ वर्षांखालील गटाच्या सामन्यात हरी बंडीबोडेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने रोहितराज युवा क्रिकेट अकादमीचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहितराज युवा संघाने २० षटकात ९ गडी गमावून १२१ धावा केल्या. लिजंडस् क्लबच्या हरी बंडीबोडेने १३ धावात ३ टिपत चमकदार गोलंदाजी केली. लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने हे आव्हान १७.१ षटकांत व ५ गडी गमावून पूर्ण केले. अयान शेख याने ४८ धावा करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.