या वेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर, डॉ. उमाकांत गरड, डॉ. चेतन तुमाले, हेंकल कंपनीचे अधिकारी प्रसाद खंडागळे, मॅनेजर यशवंत सिंग, एच. आर. योगेश पाटील, योगेश ठकार, गणेश नायक, वसीम रजा, सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य गौरव दोरगे, मयूर दोरगे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक कोरोना बाधितांवर यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.मात्र अपुऱ्या वैद्यकीय साधनेमुळे उपचारांवर मर्यादा येत होत्या.कोरोना झालेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावल्यास त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत असते.सध्या यवत कोविड सेंटर मध्ये दोन व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.
कोरोनाबधितांची संख्या सध्या कमी झाली असली, तरी येणाऱ्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुढील काळात गंभीर झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटरमुळे उपचार करणे शक्य होणार आहे.हेंकल कंपनीने कोरोना रुग्णांची गरज ओळखून एक एक व्हेंटिलेटर व दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांनी कंपनीचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यवत ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयीसुविधा असलेला कक्ष लागला तर त्याचा देखील संपूर्ण खर्च कंपनी करेल असे यावेळी हेंकल कंपनीचे अधिकारी प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.
यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देताना कंपनीचे अधिकारी प्रसाद खंडागळे , योगेश ठकार , योगेश पाटील , डॉ.इरवाडकर आदी