शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अनधिकृत बांधकाम निर्मूलन कारवाईला वेग

By admin | Updated: September 12, 2014 03:14 IST

पुरेसे मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्ताअभावी शहरात रडतखडत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निर्मूलनाच्या कारवाईस आता चांगलाच वेग मिळणार आहे.

पुणे : पुरेसे मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्ताअभावी शहरात रडतखडत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निर्मूलनाच्या कारवाईस आता चांगलाच वेग मिळणार आहे. या कारवाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र पथके निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच, या कारवाईच्या खटल्यांसाठी स्वतंत्र वकिलांचीही नेमणूक महापालिकेकडून करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम कारवाईबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच राज्यशासनानेही अशा कारवायांसाठी महापालिकेस स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यास मान्यता दिल्याने आणि या विभागांसाठी नवीन मनुष्यबळ भरण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा नियमावलीस मान्यता दिल्याने, या कारवाईस आणखी वेग येणार आहे.गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढलेली आहेत. या बांधकामांच्या प्रमाणात कारवाईसाठी महापालिकडे असलेले मनुष्यबळ आणि वेळेवर न मिळणारा बंदोबस्त यामुळे तुलनेने कमी आहे. तसेच, याबाबतची जबाबदारी निश्चित केली गेली असली तरी, या बांधकामांचे सर्वेक्षण कुणी करायचे, नोटीस कोणी द्यायची, आणि कारवाई कोणी करायची, यावरून महापालिका प्रशासनातच ताळमेळ नव्हता. त्यामुळे कारवाई प्रभावीपणे होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन, या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच प्रभावी कारवाईसाठी नुकतीच महापालिका आयुक्त कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या बांधकाम, घरपाडी विभाग, तसेच अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात अनधिकृत बांधकाम निर्मूलनासाठी प्रत्येकी एक शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक तसेच एका उपअभियंत्याची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या मदतीसाठी प्रत्येकी १५ ते २० पोलिसांचा एक गट कारवाईस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या समवेत अशी बांधकामे शोधणारा एक गटही देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)